Home | Business | Gadget | PUBG announced PUBG Tournament 2019 Competition in India with a prize pool of 1 crore

PUBG टूर्नामेंट 2019 मध्ये जो होईल विजेता त्याला मिळेल 1 कोटींचे बक्षिस; चिकन डिनर घ्या आणि कोट्याधिश व्हा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 02:38 PM IST

मोबाइल गेम PUBG भारतात लाँच झाल्यापासून या गेमला आतापर्यंत जवळपास 20 कोटींपेक्षा जास्तवेळा डाउनलोड करण्यात आले आहे.

  • PUBG announced PUBG Tournament 2019 Competition in India with a prize pool of 1 crore

    गॅजेट डेस्क- 'PUBG' खेळणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी होणाऱ्या 'PUBG' टूर्नामेंट 2019 मध्ये विजेत्यास तब्बल 1 कोटींचे बक्षिस मिळणार आहे. 'PUBG' मोबाइल गेम भारतात लाँच झाल्यापासून या गेमला आतापर्यंत 20 कोटीपेक्षा जास्तवेळा डाउनलोड करण्यात आले आहे. या गेमचे निर्माते टेन्सेंट गेम्स आणि PUBG कॉर्पोरेशन ओपोने 'PUBG' मोबाइल इंडिया सिरीजची 2019 ची घोषणा केली आहे. खास गोष्ट म्हणजे भारतात पहिल्यांदा अशाप्रकारची ओपन-टू-ऑल टूर्नामेंट होणार आहे.

    > 'PUBG'च्या निर्मात्यांनी सांगितल्यानुसार, टूर्नामेंटच्या विजेत्याला कंपनीकडून 1 कोटींचे बक्षिस देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे भारतात पहिल्यांदा अशाप्रकारच्या टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे.

    > मागील वर्षीही 'PUBG'कडून मोबाइल कँपस चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हाही 'PUBG' चॅम्पियनशिपला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळी टूर्नामेंटसाठी 30 शहरांतून 1000 पेक्षा जास्त कॉलेजमधून जवळपास 2,50,000 हून जास्त रजिस्ट्रेशन झाल्याचे 'PUBG'च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Trending