Home | News | Public Funny Memes and Hilarious Comment on Thugs of hindostan

'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'ची उडवली जातेय खिल्ली, चित्रपटावर तयार झाले 10 Jokes

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 10:38 AM IST

प्रेक्षकांच्या निगेटिव्ह कमेंट्स पाहून 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'चे डायरेक्टर थिएटरमधून मागे परतले

 • Public Funny Memes and Hilarious Comment on Thugs of hindostan

  मुंबई. दिवाळीच्या मुहू्र्तावर आमिर खान आणि अमिताभ बच्चन स्टारर 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां' हा चित्रपट रिलीज झाला. पण या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जातेय. चित्रपट रिलीज होण्यापुर्वी याची जबरदस्त क्रेज होती. पण रिलीज झाल्यानंतर क्रिटिक्सने चित्रपटाचे विशेष रिव्ह्यूव्ह दिले नाही. तर दूसरीकडे सोशल मीडियावरही लोकांनी चित्रपटाची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. अनेक यूजर्स चित्रपट बोरिंग आणि फ्लॉप असल्याचे बोलत आहेत. यूजर्सचे फनी जोक्स आणि मीम्सही सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

  - शाहरुख खानच्या 'झिरो'चे पोस्टर शेअर करुन एका यूजरने आमिर-अमिताभ यांच्या चित्रपटाला ZERO रेडिंग दिली आहे. तर 'ठग्ज...' 20 मिनिटे पाहिल्यानंतर एका ऑडयिन्सने आलिया भटच्या 'राजी' मधील एक व्हिडिओ शेअर करुन रिअॅक्शन दिली आहे. यामध्ये आलिया रडताना दिसतेय.
  - KRK ने 'ठग्ज...'चे पब्लिक रिस्पॉन्स शेअर केले आहे. यामध्ये एका यूजरने लिहिले- "मूव्हीचा पहिला हाफ निकृष्ट आहे. स्क्रीनप्ले स्लो आहे. स्टोरी चांगली नाही. मी थिएटरमध्ये आहे आणि ट्विटर पाहत आहे, यावरुन तुम्हाला समजू शकते हा चित्रपट कसा आहे. यापेक्षा तर 'रेस 3' चांगला होता." सलमान खानच्या 'रेस 3'ला वेबसाइट IMDB (Internet Movie Database) ने जगातील 100 निकृष्ट चित्रपटांमध्ये समाविष्ट केले होते.
  - प्रेक्षकांनी 'ठग्ज...' पाहिल्यानंतर रिअॅक्शन देत आमिरच्या 'पीके' चित्रपटाचा एक डायलॉग शेअर केला आहे. यामध्ये आमिर म्हणतो की, 'हमका घर जाना है भगवान, आप जो बोलेगा हम करेगा, बस हमका घर पहुंचाइ दो'.

  जेव्हा थिएटरमधून परत आले 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'चे डायरेक्टर
  'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'चे डायरेक्टर विजय कृष्ण आचार्य हे चित्रपटाला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स जाणून घेण्यासाठी बांद्राच्या एका सिंगल स्क्रीनमध्ये गेले होते. परंतु येथे प्रेक्षकांचा निगेटिव्ह रिस्पॉन्स पाहून ते मागे परतले. विक्टर यांना या चित्रपटकाडून खुप जास्त अपेक्षा होत्या. पण असे काही झाले नाही. चित्रपटाची कथा प्रेक्षकांमध्ये रोमांच निर्माण करण्यात अपयशी ठरली. तर काही लोकांनी चित्रपट बोर असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.

Trending