आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाढीबाबत वीज नियामक अायाेगाची अाज जनसुनावणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महावितरण कंपनीने ठेवलेल्या जवळपास ३० हजार ८०० काेटी रुपयांच्या वीजदरवाढ प्रस्तावावरील वीज नियामक अायाेगाची जनसुनावणी साेमवारी (दि. १३) नाशिकमध्ये हाेत असून, उद्याेजक, शेतकरी, सामान्य ग्राहकांतून वीजदरवाढीला तीव्र विराेध हाेत असल्याने जनसुनावणीतही हेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता अाहे. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवनात ही सुनावणी हाेणार अाहे.

 
वीजदरवाढ प्रस्तावाविराेधात बैठका, प्रस्तावांची हाेळी, लाेकप्रतिनिधींना विराेध करण्याचे अावाहन यासारख्या बाबी अातापर्यंत नाशिकमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या अाहेत. विशेष म्हणजे, महावितरणचा भ्रष्टाचार व गळतीच या वीजदरवाढीला जबाबदार असल्याचा जाहीर अाराेप महाराष्ट्र वीज संघटनेचे अध्यक्ष प्रताप हाेगाडे यांनी नाशिकमध्ये झालेल्या बैठकांतून केला अाहे. महावितरणनेही प्रसिद्धी पत्रक काढून दरवाढ याेग्य असल्याचे म्हटले अाहे. मात्र, दाेन वर्षात दुसरी माेठी दरवाढ मागितली जात असून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची पटपडताळणी, अंदाजे बिलांची अाकारणी, निगेटीव्ह फिडर मॅपिंग असे गंभीर प्रकार समाेर अालेले असतानाही त्यासंदर्भातील अायअायटी, मुंबईचा किंवा नेमलेल्या समितीचा अहवाल महावितरण किंवा राज्य सरकार जनतेसमाेर ठेवत नसल्याने भ्रष्टाचार झाकण्याचे काम सुरू असल्याचा संताप जनतेतून व्यक्त हाेऊ लागला अाहे. महावितरणच्या या कारभाराने ९८ पैसे प्रती युनिट प्रत्येक वीज ग्राहकाला जादा माेजावे लागत असल्याचे वीज ग्राहक संघटनेचे म्हणणे अाहे. 


प्रत्येकाला करता येणार दरवाढीचा विराेध 
जनसुनावणीत प्रत्येक वीज ग्राहकाला या दरवाढीचे समर्थन अथवा विराेध नाेंदविता येणार अाहे. ताे त्याचा हक्क अाहे. यासाठी अापले म्हणणे सात प्रतींमध्ये तयार करून सुनावणीच्या ठिकाणी जमा करावे. तेथील वहीत अापले नाव नाेंदवावे. लेखी अाणि ताेंडी अशा दाेन्ही प्रकारे म्हणणे मांडायचे असल्यास तसा उल्लेख करावा किंवा ज्यांना ताेंडी म्हणणे मांडायचे नाही, त्यांनी केवळ लेखी सात प्रती येथे जमा कराव्यात, असे वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी अॅड. सिद्धार्थ साेनी यांनी सांगितले. 


फडणवीसांनी असा केला हाेता अाराेप.. 
दरवाढीला विराेध करणाऱ्या संघटनांमार्फत सांगण्यात अाले की, विद्यमान मुख्यमंत्री व भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवंेद्र फडणवीस यांनी नाशिक येथे २०१३ मध्ये वीजबिलांची हाेळी करताना, 'ऊर्जामंत्री अाणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी माेठ्या प्रमाणावर कमिशन खाल्ल्यानेच सर्वसामान्यांना वीजदरवाढ सहन करावी लागत अाहे', असा अाराेप केला हाेता. राज्य सरकारसह महाजनकाे, महापारेषण अाणि वीज वितरण कंपनीतील भ्रष्टाचारामुळे वीजदरवाढ हाेत असून त्यामुळे अनेक उद्याेग इतर राज्यात स्थलांतरीत हाेत असल्याचेही फडणवीस त्यावेळी म्हणाले हाेते. २०१४ मध्ये भाजपचे सरकार राज्यात सत्तेत येऊन फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांनी केलेल्या अाराेपांची चाैकशी अद्याप झाली नाही. वीजदरवाढीचे प्रस्ताव येतच अाहेत. सामान्यांना वीजदरवाढ सहन करावीच लागत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...