आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रांची शिकवण/ दिवा, देवी-देवतांच्या मूर्ती, शंख कधीच जमीनवर ठेऊ नये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनमंत्र डेस्क- आठरा पुराणांपैकी एक ब्रह्मवैवर्त पुराणाला वैष्णव पुराणही म्हटले जाते. यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा महिमा सांगितला आहे. हा महिमा चार खंडामध्ये विभाजित केलेला आहे. पहिला खंड ब्रह्म खंड, दुसरा प्रकृती खंड, तीसरा गणपती खंड आणि चौथा श्रीकृष्ण जन्म खंड आहे. तसेच या पुराणामध्ये श्रेष्ठ आयुष्यासासाठी अनेक सुत्र सांगितले आहेत. तर जाणून घ्या ब्रह्मवैवर्तपुराणमधील काही अशा गोष्टी ज्यांचा अवलंब दैनंदिन आयुष्यात केला पाहिजे...


दैनंदिन लक्षात ठेवायच्या गोष्टी...

पुजा करताना या गोष्टी जमीनीवर ठेवू नये
दिवा, शिवलिंग, शालिग्राम, मणी, देवी-देवतांच्या मुर्ती, यज्ञोपवीत (जानवे), शंख, या वस्तूंना तशाच खाली ठेवू नका. त्यासाठी एक कपडा खाली टाका किंवा एखाद्या उंच ठिकाणी ठेवाव्यात.


सकाळी उठल्यावर लक्षात ठेवा या गोष्टी
सकाळी उठल्याबरोबर 'इष्ठदेवाचे' ध्यान करताना आपल्या दोन्ही तळहातांना बघितले पाहिजे. त्यानंतर लगेच अंघोळ करावी. रात्री घातलेले कपडे लवकर काढून टाकावेत.


यांचा अपमान करू नका
आपण कोणत्याही परिस्थितीत, आई-वडील, मुलगा-मुलगी, पतिव्रता पत्नी, श्रेष्ठ पती, गुरू, अनाथ स्त्री, बहिण, भाऊ, देवी-देवता आणि ज्ञानी लोकांचा अपमान करू नये. कारण, असे केल्याने एखादा व्यक्ती श्रीमंत असला तरी त्याची सर्व पत-प्रतिष्ठा नष्ट होते.


ठरवलेल्या तिथीवर पुर्ण केला पाहिजे दान करण्याचा संकल्प
जर आपण कोणाला दान देण्याचा संकल्प केला असेल तर ठरवलेल्या तिथी दिवशी कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करणे आवश्यक आहे. दान देताना एक दिवसाचा उशीर झाला तर दुप्पट दान दिले पाहिजे. तसेच आपल्याला दान देण्यात एक महिना उशीर झाला तर शंभर पटीने दान करावे आणि जर दान करण्यासाठी दोन महिने उशीर झाला तर त्याची रक्कम सहस्त्रगुनी म्हणजे हजार पट होते. त्यामुळे दान करण्यासाठी जेव्हा आपण संकल्प कराल तर ठरवलेल्या तिथीवरच पूर्ण करावा.
 

बातम्या आणखी आहेत...