Home | Sports | From The Field | Pujara saves india on First day of Ind vs Aus Adelaide test

अॅडलेड टेस्टमध्ये पहिल्या दिवशी पुजारा ठरला भारताचा तारणहार, शतकी खेळी करत लढवला किल्ला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 04:52 PM IST

संपूर्ण टीमची कांगारुंच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली असताना, पुजारा मात्र मैदानात टिकून होता.

 • Pujara saves india on First day of Ind vs Aus Adelaide test

  अॅडलेड - ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाची वाईट अवस्था झाल्याचे पाहायला मिळाले. या स्थितीत भारतासाठी भक्कमपणे उभा राहिला तो चेतेश्वर पुजारा. पुजाराने एकाकी किल्ला लढवत भारताला अत्यंत वाईट स्थितीतून बाहेर काढले. संपूर्ण टीमची कांगारुंच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली असताना, पुजारा मात्र मैदानात टिकून होता. शतकी खेळी करत त्याने भारताची लाज राखली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

  अॅडलेड येथील मैदानावर नाणेफेक जिंकत भारताची चांगली सुरुवात झाली. पण त्यानंतर मात्र भारतासाठी फार काही चांगले घडताना दिसले नाही. कारण मिशेल स्टार्क, हेजलवूड आणि कमिन्स यांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. राहुल, विजय, कोहली, राहणे असे आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले. त्यामुळे भारताची अवस्था 4 बाद 41 अशी झाली. त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने काही काळ मैदानावर टिकाव धरला. तो आनंदही टीम इंडियाच्या चाहत्यांना फार काळ घेता आला नाही. 37 धावा करत रोहितही परतला.

  एकिकडे भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे लोटांगण घालत होते. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजुने चेतेश्वर पुजाराने बाजू लावून धरली होती. अत्यंत संयमीपणे फलंदाजी करत त्याने भारताचा डाव पुढे रेटला. अश्विन आणि पंत यांच्या 25-25 धावांच्या साथीने त्याने भारताची धावसंख्या पुढे नेत ठेवली. तळाच्या फलंदाजांना सांभाळून घेत त्याने भारताचा डाव 200 च्या पुढे नेला. करिअरचे 16 कसोटी शतक झळकावत त्याने भारताच्या खात्यातील 250 धावांमध्ये मोलाची कामगिरी केली. तो 123 धावांवर रन आऊट झाला. दिवसअखेर भारताच्या 9 बाद 250 धावा झाल्या.

  असा राहिला पहिला दिवस
  > नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
  > एकापाठोपाठ विकेट्स गमावल्याने भारताची अवस्था 5 बाद 86 अशी झाली होती.
  > चेतेश्वर पुजाराने एकाकी लढा देत भारताचा डाव सावरला आणि भारताला सुस्थितीत आणले.
  > पुजाराने 123 धावांची खेळी केली. तो पायचित झाला.
  > पुजाराशिवाय रोहित 37, पंत 25 आणि अश्विन 25 यांनी हातभार लावला.
  > ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स, हेजलवूड, स्टार्क लिऑन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
  > पहिल्या दिवसअखेर भारताची धावसंख्या 9 बाद 250 अशी होती.

  पुढील स्लाइड्सवर फोटोतून पाहा, पहिल्या दिवसाची झलक..

Trending