आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरी कसाेटी/दुसरा दिवस: पुजाराचा पराक्रम; अाशियाबाहेर प्रथमच एकाच मालिकेत 2 शतके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- अाघाडीच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाने गुरुवारी यजमान अाॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात धावांचा डाेंगर उभा केला. भारताने ७ बाद ४४३ धावांवर घाेषित केला. टीम इंडियाच्या फलंदाज चेतेश्वर पुजाराने (१०६) शानदार शतक झळकावले. त्याने पहिल्यांंदा अाशिया खंडाबाहेर एकाच मालिकेत दाेन शतके साजरी केली अाहेत. तसेच राेहित शर्माला तीन वर्षांनंतर प्रथमच अाशिया खंडाबाहेर अर्धशतकी खेळी करता अाली. त्याने ६३ धावांचे याेगदान दिले. तसेच कर्णधार काेहलीने ८२, अजिंक्य रहाणेने ३४ अाणि ऋषभने ३९९ धावांची खेळी केली.

 

पहिल्याच दिवशी अर्धशतकी खेळी करून युवा फलंदाज मयंक अग्रवालने (७६) सर्वांचे लक्ष वेधले. प्रत्युत्तरात यजमान अाॅस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी पहिल्या डावात बिनबाद ८ धावा काढल्या. अद्याप ४३५ धावांनी पिछाडीवर असलेल्या अाॅस्ट्रेलियाकडे अाता १० विकेट शिल्लक अाहेत. टीमचा सलामीवीर मार्कस हॅरिस (५) अाणि अॅराेन फिंच (३) मैदानावर खेळत अाहेत. अाता टीमला त्यांच्याकडून माेठ्या खेळीची अाशा अाहे. तत्पूर्वी यजमान अाॅस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तसेच मिशेल स्टार्कने दाेन, जाेश

हेेझलवुड अााणि नॅथनने प्रत्येकी एक बळी घेतला.

 
भारताने दुसऱ्या दिवशी कालच्या २ बाद २१५ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. सकाळच्या पहिल्या सत्रात टीमच्या पुजारा अाणि काेहलीने संयमी खेळी करताना धावसंख्येला गती दिली. त्यामुळे लंचपर्यंत भारताला एकही विकेट न गमावता २७७ धावा काढता अाल्या. त्यानंतर मिशेल स्टार्कने टीम इंडियाला धक्का दिला. त्याने काेहलीची महत्त्वाची विकेट काढली. ताे अप्पर कट मारण्याच्या प्रयत्नात फिंचकरवी झेलबाद झाला.

 

दाैऱ्यामध्ये सत्रात सर्वाधिक धावा काढणारा काेहली एकमेव
विराट काेहलीने  ८२ धावांची खेळी केली. यासह त्याने राहुल द्रविडचा १६ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम माेडीत काढला. त्याने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा पल्ला गाठला. त्याने यंंदा ११३८ धावांची नाेंद नावे केली. द्रविडच्या नावे २००२ मध्ये विदेश दाैऱ्यामध्ये एका सत्रात ११३७ धावांचा विक्रम हाेता.

 

राेहित शर्माची दाेघांसाेबत अर्धशतकी भागीदारी; ठाेकले नाबाद अर्धशतक
राेहितने अर्धशतकाची नाेंद केली. याशिवाय त्याने  रहाणे व ऋषभसाेबत अर्धशतकी भागीदारीही केली.  त्याने रहाणेसाेबत पाचव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. रहाणेने ७६ चेंडूंत ३४ धावा केल्या.  त्याला नॅथनने बाद केले.  राेहित व ऋषभने सहाव्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी नाेंदवली.

   

पुजाराचा विक्रम
भारताचा चेतेश्वर पुजारा हा तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात चमकला. त्याने शानदार खेळी करताना करिअरमधील १७ वे शतक साजरे केले. तसेच त्याने करिअरमध्ये चाैथ्यांदा एका मालिकेत दाेन शतके झळकावली. याशिवाय त्याच्या नावे अाता अाशिया खंडाबाहेर मालिकेत दाेन शतके साजरी करण्याचा विक्रम नाेंद झाला. त्याने ३१९ चेंडूंत १० चाैकारांसह  १०६ धावा काढल्या.  राेहितने २०१५ नंतर अाशियाबाहेर अर्धशतक ठाेकले.  

 

बातम्या आणखी आहेत...