आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीवेजच्या पाण्यात तरंगत होता मेंदूसारखा जीव, आधी वाटले सापाची पिले, पण नंतर समोर आली ही बाब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास - अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये पाण्यात तरंगणारा एक मेंदूसारखा जीव पाहून लोकांमध्ये भीती पसरली. याठिकाणी झालेल्या जोरदार पावसाचे एका घरात सीवेजचे पाणी टॉयलेटमधून रिव्हर्स आले. हा व्यक्ती पाणी बाहेर काढण्यासाठी गेला तेव्हा तो चांगलाच घाबरला. त्याने लगेचच मोबाईल काढला आणि रेकॉर्डींग सुरू केले. त्यात हजारो साप एकत्रित गुंडाळले असल्यासारखे दिसत होते. 


नेमके काय होते.. 
- या व्यक्तीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, घरात बाथरूमजवळ भरपूर पाणी साचले होते. मी पाहिले तर त्यात अनेक लाब किडे आत घुसत आणि बाहेर येत होते. असे वाटत होते सगळे एकत्र जोडलेले आहेत. 
- तज्ज्ञांच्या मते हे सीवेजमधील घाणेरडे किडे असू शकतात. त्यांना स्लज वॉर्मही म्हटले जाते. कदाचित या सर्व कीडे एकत्रित आल्याने हा मेंदूसारखा दिसणारा जीव तयार झाला असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. 


असू शकते गांडूळाची प्रवृत्ती 
- कीड्यांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ टिमूथी वूड म्हणाले की, हे नक्कीच ट्यूबफिक्स वॉर्म किंवा गांडुळांची प्रजाती आहे. पाणी साचल्याने किंवा मातीतून ते पाण्यात पडले असावे. त्यात माती न मिळाल्याने ते एकावर एक चढले असतील आणि असा जीव तयार झाला. 

 

जगात गांडुळाच्या 17 हजार प्रजाती 
रिपोर्ट्सनुसार जगात गांडुळाच्या सुमारे 17 हजार प्रजाती आहेत. हे गांडूळ नेहमी ओली माती. नद्या, अशा ठिकाणी राहतात. ऑक्सिजनची कमतरचा असल्याने ते वर येतात. 

बातम्या आणखी आहेत...