आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pulwama Attack In Martyrs Of Soldiers Faimly Taken To Haridwar At Expense The Farmer Of Surat Shankar Patel

पितृतर्पण: पुलवामामध्ये शहीद जवानांच्या कुटुंबीयांना स्वखर्चाने हरिद्वारला नेणार हा शेतकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- शेतकरी शंकर पटेल यांनी स्वखर्चाने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना हरिद्वार येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे. शहीदांच्या कुटुंबीयांना 5 मे रोजी हरिद्वार येथे नेऊन शंकर पटेल हे पितृतर्पण करण्यात आहेत.

 

शहीदांच्या कुटुंबीयांचा हरिद्वारमध्ये जाणे-येणे आणि तिथे राहण्या-खाण्याचा संपूर्ण खर्च शंकर पटेल करणार आहेत. यासाठी शंकर पटेल हे सीआरपीएफच्या शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबीयांच्या संपर्क करत आहेत. शहीदांचे कुटुंबीय 16 राज्यांत राहतात. शंकर यांनी सांगितले की, ठिकठिकाणच्या जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा झाल्याचे शंकर पटेल यांनी सां‍गितले.

 

श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ

शंकर पटेल यांनी हरिद्वार येथे 7 ते 13 मेदरम्यान श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञाचे आयो‍जन करण्यात आले आहे. सप्ताहात सहभागी होण्यासाठी सुरत शहरासह जिल्ह्यातील 1200 हून अधिक भाविक जाणार आहेत. यापैकी कोणत्याही भाविकाची पिंडदान करण्याची इच्छा असेल तर त्याचा संपूर्ण खर्च शंकर पटेल करणार आहेत.

 

एक कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित..

दोन खोल्याच्या घरात राहणारे शेतकरी शंकर पटेल यांनी सांगितले की, शहीदांच्या कुटुंबीयांना हरिद्वार येथे नेण्यासाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शंकर पटेल हे मूळचे हरियाणा येथील आहेत. सामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांना धार्मिक यात्रा घडविल्याने मन:शांती मिळत असल्याचेही शंकर पटेल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...