आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी पुलवामा हल्ल्याचा म्होरक्या मुदस्सीर खान याचा साथीदार जैश-ए-मोहंमदचा दहशतवादी सज्जाद खानच्या दिल्लीत मुसक्या बांधल्या. त्याला अटक करण्यात आली असून शुक्रवारी एनआयएने पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सज्जादला २९ मार्चपर्यंत एनआयएच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.
दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्री दिल्लीच्या लाजपत बाजारपेठेतून त्यास अटक केली होती. त्यानंतर त्याला एनआयएच्या ताब्यात दिले. पुढे त्यास ताब्यात देण्याची विनंती तपास संस्थेने कोर्टाला केली. सज्जाद खान १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या सीआरपीएफच्या तळावर झालेल्या हल्ल्याच्या कटातील एक मुदस्सीरच्या साथीदारापैकी एक आहे. एनआयएमध्ये २७ वर्षीय सज्जादच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. तपास संस्था त्याच्या मागावर होत्या. तो दिल्लीत जैशचा स्लिपर सेल बनवण्यासाठी आला होता. मुदस्सीरला अलीकडेच जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले होते.
मुस्लिम तरुणांना संघटनेत सहभागी करून घेण्याची जबाबदारी
पाेलिसांच्या मते, हल्ल्याच्या दिवशी सज्जाद खान व्हॉट्सअॅपवर आत्मघाती हल्लेखोरांच्या संपर्कात होता. नंतर त्याने काही व्हिडिआे डिलिट केले होते. चौकशीत सज्जादला दिल्ली, उत्तर प्रदेशशिवाय इतर राज्यांतील मुस्लिम तरुणांना संघटनेत सहभागी करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सज्जाद मूळचा पुलवामाचा आहे. त्याचे दोन भाऊदेखील जैश-ए-मोहंमदचे दहशतवादी होते. त्यांचाही चकमकीत खात्मा झाला होता. सज्जादच्या एक भावास दगडफेकीच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्याचवेळी त्याची भेट जैश-ए-मोहंमदचा दहशतवादी नूर मोहंमदशी झाली होती. पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवाया होतात. त्याला रोखण्यासाठी भारताने या हल्ल्यानंतर मोठी हवाई कारवाई केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.