• Home
  • National
  • Delhi
  • Pulwama Attack: Rahul Gandhi On BJP Government Over Pulwama Attack Anniversary, PM Narendra Modi pays tribute to Pulwama bravehearts

पुलवामा हल्ला / देश शहीदांचे बलिदान कधीच विसरणार नाही- नरेंद्र मोदी; हल्ल्यामुळे कोणाला फायदा झाला- राहुल गांधी

  • राहुल गांधींनी केल शहिदांना स्मरण आणि सरकारला विचारले तीन प्रश्न 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 02:55:06 PM IST

नवी दिल्ली- आज पुलवामा हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी ट्वीट केले, "मागच्या वर्षी पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांना माझी श्रद्धांजली. ते सर्व असाधारण व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आपले जीवन अर्पण केले. देश त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही." दुसरीकडे, राहुल गांधींनी शहीद सीआरपीएफ जवानांचे स्मरण केले आणि या घटनेवरुन सरकारला तीन प्रश्न विचारले.

राहुल गांधीनी पहिला प्रश्न केला की, या हल्ल्यामुळे सर्वात जास्त कोणाला फायदा झाला? दुसरा, हल्ल्यानंतर झालेल्या चौकशीचा परिणाम काय झाला आणि तिसरा, भाजप सरकारने या हल्ल्यात झालेल्या चुकीबद्दल कोणाला जबाबदार ठरवले? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील आजच्या दिवशी शहीदांचे स्मरण करुन त्यांचे बलिदान कोणीच विसरणार नाही, असे ट्वीट केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.


सीआरपीएफ कँपमध्ये शहीदांना श्रद्धांजली

श्रीनगरमधील सीआरपीएफच्या लेथपोरा कँपमध्ये शहीद 40 जवानांच्या स्मारकावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यादरम्यान महाराष्ट्राचे उमेश गोपीनाथ जाधव मुख्य अतिथी होते. जाधव पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व 40 जवानांच्या घरी गेले होते. त्यासोबतच जाधव यांनी जवानांचे अंतिम संस्कार झाले, त्या ठिकाणाची माती घेऊन आले होते. यासाठी त्यांनी देशभरात 61 हजार किमीचा प्रवास केला. यादरम्यान सीआरपीएफचे संचालक जुल्फिकार हसन म्हणाले की, "एनआयएने या प्रकरणाचा संपर्ण तपास केला आहे. आम्हीदेखील या प्रकरणात खूप प्रगती केली आहे. आम्ही शहीदांच्या कुटुंबीयांकडे संपूर्ण लक्ष देत आहोत. पुलवामा हल्ला रचणाऱ्याला घटनेच्या काही दिवसानंतर मारले होते. ज्यांनी हा हल्ला घडवला, त्यांनाही मारण्यात आले आहे."


हल्यानंतर भारताने बालाकोट स्ट्राइकमध्ये 200-300 दहशतवादी मारले


14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू-श्रीनगर हायवेवर झालेल्या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला होता. तपासात हा हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आल्याची माहिती आली होती. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2019 भारतीय वायु सेनेतील बारा मिराज 2000 जेट्सने नियंत्रण रेषा पार करुन बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी स्थळावर हल्ला केला. यात 200-300 दहशतवादी मारल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला.

X
COMMENT