आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pulwama Attack: Terrorists Online Purchased Chemicals To Make Bombs For Pulwama Attack, Nia Reveals

हल्ल्यासाठी अॅमेझॉनवरून करण्यात आली होती रसायनांची खरेदी; एका वर्षानंतर खुलासा, दोघांना अटक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याच्या एका वर्षानंतर या घटनेत नवीन खुलासा समोर आला आहे. त्यानुसार, पुलवामा येथे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी स्फोटकांमध्ये वापरण्यात आलेले केमिकल अॅमेझॉनवरून खरेदी करण्यात आले होते. पुलवामाच्या आत्मघातकी हल्ल्यात इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस वापरण्यात आले होते. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने वैज उल इस्लाम (19) आणि मोहंमद अब्बास राथेड (32) या दोघांना अटक केली. वैज श्रीनगर आणि अब्बास पुलवामाच्या हाकरीपोरा येथील रहिवासी आहे. पुलवामा हल्ल्यात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली. त्यातील संशयित बाप-लेकीला तीन दिवसांपूर्वीच पकडण्यात आले. या बाप-लेकीवर दहशतवाद्यांना शरण दिल्याचा आरोप आहे. 14 जानेवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करून झालेल्या पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, "प्राथमिक तपासात वैजने अॅमेझॉनवरून केमिकल खरेदी केल्याची कबुली दिली आहे. यातून आयईडी स्फोटके बनवण्यात आली होती. सोबतच, बॅटरी आणि इतर साहित्य सुद्धा ऑर्डर करण्यात आले होते. यासाठी पाकिस्तानच्या जैश-ए-मोहंमद दहशतवाद्यांकडून त्यांना निर्देश मिळाले होते. अॅमेझॉनवरून ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी मिळताच वैजने ती साहित्ये जैशला दिली होती." तर अब्बास बद्दल सांगताना अधिकारी म्हणाले, "अब्बास गेल्या अनेक वर्षांपासून जैशसाठी काम करत होता. त्यानेच जैशचा दहशतवादी आणि बॉम्ब एक्सपर्ट मोहंमद उमरला आपल्या घरात शरण दिली होती. उमर एप्रिल-मे 2018 मध्ये काश्मिरात आला होता." त्यानेच जैशचे इतर सदस्य आदिल अहमद दार (आत्मघातकी हल्लेखोर), समीर अहमद दार आणि कामरान (पाकिस्तानी) यांना आपल्या घरात राहण्याची व्यवस्था केली होती.

बातम्या आणखी आहेत...