Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | pumpkin seeds health benefits in Marathi

भोपळ्याच्या बिया हृदय आणि मेंदूसाठी आहेत उपयुक्त 

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 10, 2019, 12:10 AM IST

अॅनिमियाच्या रुग्णाने दररोज भोपळ्याच्या िबया खायला पाहिजेत.

 • pumpkin seeds health benefits in Marathi

  शरीराला आजारपणापासून वाचवण्यासाठी पोषक तत्त्वांनी युक्त भोपळा आणि सूर्यफुलाच्या बियांचा आहारात अवश्य समावेश करा. होतील हे खास फायदे...
  १. लाल भाेपळ्याच्या बिया
  भोपळ्याच्या बियांमध्ये लोहाची पुरेशी मात्रा असते. त्यामुळे अॅनिमियाच्या रुग्णाने दररोज भोपळ्याच्या िबया खायला पाहिजेत. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर या बिया खाणे सुरू करा. यात असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते. यामुळे शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि त्वचा, केसासंबंधी समस्या दूर होतात. या बियांमध्ये अॅमिनो अॅसिड, झिंक, मँगनीज आणि आेमेगा ३ फॅटी अॅसिड्स असते, जे मेंदूची शक्ती वाढवते. यासह मिरगी, मायग्रेन, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.


  2. सूर्यफुलाच्या बिया
  या बिया व्हिटॅमीन ईचा चांगला सोर्स आहे. म्हणून सौंदर्य वाढवण्यासाठी आणि वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्यासाठी हे खायला पाहिजे. या बियांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. म्हणून मांसपेशीचा अशक्तपणा दूर करण्यासाठी याचे सेवन करणे गरजेचे आहे. यामध्ये कॉपर आणि सेलेनियमने जास्त असलेल्या या बियांमुळे त्वचेसंबंधी समस्या जसे पांढरे डाग यासाठी फायदेशीर आहे. यात पोषक तत्त्वे असतात जी हृदयाला निरोगी ठेवतात. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा नियंत्रणात ठेवतात. हे चांगल्या कोलेस्टेरॉल (एचडीएल) ची मात्रा वाढवते आणि वाईट कोलेस्टेरॉल (एलडीएल) ला कमी करण्यासाठी सहायक आहे.

Trending