Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Pundalik temple with Other temples will be built in moon shapes

पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे चंद्रकोर आकारात साकारणार; जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची माहिती

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 11:24 AM IST

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर शहरामध्ये विकासकामे सुरू आहेत. ८६ कामे पूर्ण झाली असून २५ कामे प्रगतिपथावर आहे

  • Pundalik temple with Other temples will be built in moon shapes

    सोलापूर- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर शहरामध्ये विकासकामे सुरू आहेत. ८६ कामे पूर्ण झाली असून २५ कामे प्रगतिपथावर आहेत, तर १२ कामे सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासह शेजारी असलेली मंदिरे चंद्रकोर आकारात साकारण्यात येणार आहेत. यासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.


    पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्ते, शौचालय, ६५ एकर भंडीशेगाव पुलाचे रूंदीकरण, चंद्रभागा नदीवरील पूल ही कामे मार्गी लावण्यात आली आहेत. सुलभ शौचालयाची कामे सुरू आहेत. उर्वरित कामांबाबत विभागीय आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. नामदेव महाराज स्मारक उभारण्याची जागाच गैरसोयीची असल्याने ६५ एकर जागेवर नामदेव महाराज स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी शिंपी समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. म्हसोबा मंदिर ते महाद्वार घाट असा लोखंडी पूल उभारायचा की क्रॉंकिट रस्ता निर्माण करायचा याबाबत विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यात येणार आहे. जो योग्य पर्याय राहिल, तो निर्णय घेण्यात येणार आहे.


    वाखरी पालखी तळासाठी भाड्याने घेणार जागा...
    वाखरी पालखी तळासाठी सध्याची जागा कमी पडत असल्याने शेजारील १८ हेक्टर जागा संपादित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. मात्र बैठकीत ही जागा संपादित करण्याऐवजी वारी कालावधीत १५ दिवस भाड्याने घ्यायची व उर्वरित दिवस शेतकऱ्यांना कसण्यासाठी द्यायची असा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संंबंधित शेतकऱ्यास जमिनीचे भाडे देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Trending