आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंढवाची पुनरावृत्ती : पुण्यात कात्रज परिसरात भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी; सर्व पीडित छत्तीसगडचे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कोंढवा येथील भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यूची घटना ताजी असतानाच आता कात्रज भागात सिंहगड संस्थेची संरक्षण भिंत कोसळली. या घटनेत 6 मजुरांचा मृत्यू झाला असून इतर 5 जण जखमी आहेत. या जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राधेलाल पटेल (25), जेटू लाल पटेल (50), ममता राधेलाल पटेल (22), जेटू चंदन रवते अशी मृतांपैकी चौघांची नावे आहेत. जखमी आणि मृत झालेले मजूर हे सगळेच छत्तीसगडचे रहिवासी होते अशी माहिती समोर आली आहे.

 

आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या ठिकाणी अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मुसळधार पावसात आधी झाड पडले. त्यानंतर भिंत कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. अग्निशमन दलाला बचावकार्यात एनडीआरएफच्या टीमने देखील मदत केली.

 

29 जून रोजी घडली होती कोंढवा दुर्घटना 

पुण्यातील कोंढवा भागात 29 जूनच्या मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला. कोंढवा येथील एका कंपनीसमोर ही दुर्घटना घडली. हे सर्वच मजूर देखील इतर राज्यातून महाराष्ट्रात रोजगारासाठी आले होते. ते सगळेच बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील रहिवासी होते.