आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रींकडून देहविक्री करणारा एम्सचा माजी डाॅक्टर अटकेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मल्याळी आणि हिंदी चित्रपटांतील अभिनेत्रींकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधील निवृत्त डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. या वेळी २४ आणि २५ वर्षांच्या अभिनेत्रींची सुटका करण्यात आली असून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. डॉ. सुरेशकुमार सूद (७४, रा. १०८, किंग्ज अपार्टमेंट, मीरा रोड, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे फौजदार अनंत व्यवहारे यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. सूद हा दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाला आहे. 


तो मुंबईतील २४ व २५ वर्षांच्या हिंदी आणि मल्याळी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती मिळाली. यावरून बंडगार्डन भागातील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोगस ग्राहकाद्वारे सापळा रचण्यात आला. १० हजार रुपयांची टोकन रक्कम देऊन पुण्यात आणण्यात आले असता त्यांना हॉटेलच्या रूम नंबर ८०१ व ८०४ मधून रेस्क्यू करण्यात आले. तर दलाल म्हणून काम करणाऱ्या डॉ. सूद याला वेटिंग रूममधून अटक करण्यात आली. आरोपी सूद याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले अाहेत. डाॅ.सूद हा अाराेपी शहनाज ऊर्फ सीमा या मुंबईतील अंधेरी भागात राहणाऱ्या वेश्याव्यवसायातील महिला दलालासाठी काम करत होता.


अभिनेत्री सुधारगृहात
सूदचे वय जास्त असल्याने त्याच्यावर काेणास संशय येणार नाही, यामुळे त्याचा वेश्याव्यवसायातील दलाल म्हणून वापर करत करण्यात येत होता. दरम्यान, दाेन्ही अभिनेत्रींना सुधारगृहात ठेवण्यातत आले आहे.

बातम्या आणखी आहेत...