आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे शहरात अद्याप बंदचा परिणाम नाही, प्रकाश आंबेडकरांनी आंदोलकांना केले शांततेचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. परंतु, पुणे शहरात अद्याप बंदचा काही परिणाम जाणवला नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

या बंदला शहरात 35 सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. बंदला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा वंचितचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लोकांपर्यंत जे पोहोचवायचे, ते पोहोचले असे मला वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबत, पुण्यातील काही ठिकाणी आणि औरंगाबेदत सुद्धा बंद दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यावर बोलताना बंद दरम्यान शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. यासोबतच, मुंबईतील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आहे. तर मनमाडमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे.