Home | Maharashtra | Pune | Pune celebrates dipwali at Shaniwar Wada

अबब..80000 दिव्यांच्या प्रकाशाने उजळला शनिवार वाडा; सुरू झाला दीपावली उत्सव

दिव्यमराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 05:59 PM IST

> पेशवाई च्या काळात सुरू झाली होती ही परंपरा. > इंग्रजांनी बंद केलेली ही परंपरा झाली पुन्हा सुरू.

 • Pune celebrates dipwali at Shaniwar Wada

  पुणे- दिवाळीच्या दोन दिवस अगोदर पुणे शहरातील शनिवार वाड्यामध्ये दीपोत्सव सुरू झाला आहे. पेशव्यांची शान असलेल्या शनिवार वाड्यात सोमवारी 80 हजार दिव्यांनी रोषणाई करण्यात आली. वाड्याला सजवण्याची परंपरा पेशव्यांच्या काळापासून चालत आली आहे. शनिवार वाड्यामध्ये दीपोत्सवाची परंपरा 1734 मध्ये सुरू झाली होती आणि 1818 पर्यंत ती कायम होती. यानंतर इंग्रजांनी या दीपोत्सवावर बंदी घातली होती. परंतु 1999 मध्ये पुण्याच्या चैतन्य हास्य क्लबकडून ही परंपरा परत सुरू करण्यात आली.

  80000 दिव्यांनी बनविली लक्ष्मीची प्रत‍िकृती..

  > दीपोत्सवाने शनिवार वाड्याच्या प्रांगणामध्ये अलौकिक दृश्य पाहायला मिळले. एकाचवेळी 80 हजार दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण वाडा उजळून निघाला होता. या ठिकाणी अनेकांनी प्रकाशमय दिव्यांनी आकृति बनवल्या तर काहींनी माता लक्ष्मीची प्रतिकृती तयार करुन त्याला दिव्यांनी सजवले.

  गरीब मुलांना वाटले गिफ्ट

  > दीपोत्सवानंतर शहरातील लोकांनी गरीब मुलांना कपडे, पुस्तके आणि खेळणी वाटून सगळे वातावरण आनंदित करुन टाकले.

  काय आहे शनिवार वाड्याचा इतिहास-

  > पुण्यामध्ये बाजीराव रोडवर अभिनव कला मंदिराजवळ शनिवार वाडा आहे. शनिवार वाडा हा पुणे शहराची शान समजला जातो. शनिवार वाडा महाल हा पेशव्यांचा निवास स्थान म्हणून बांधण्यात आला होता. 10 जनवरी,1730 मध्ये पहिल्या बाजीरावांनी या वाड्याचा पाया रचला. त्याकाळी या वाड्याचे महालात रुपांतर करण्यासाठी 16,110 रुपये खर्च झाला होता. या महालामध्ये एकावेळी 1000 पेक्षा जास्त लोक राहू शकत होते. जवळपास दोन वर्षानंतर 22 जानेवारी 1732 रोजी हिंदू चाली रीती प्रमाणे या महालात गृहप्रवेश करण्यात आला.

  आतमधून खूपच सुंदर आहे हा महाल-

  > महालाच्या भिंतीवर महाभारत आणि रामायण काळातील दृश्ये कोरलेले आहे. इथे दरदिवशी संध्याकाळी 7.15 ते 8.10 पर्यंत एक विशेष लाइट अॅन्ड साउंड शो दाखवण्यात येतो. या शोला पाहण्यासाठी पुणे आणि जवळपासच्या शहरातले लोक येतात. या महालाच्या पहिल्या मजल्यावर 18 व्या शतकातील अनेक वस्तु आणि मुर्ती ठेवल्या आहे. सध्या आता हा वाडा पुणे नगरपालिकेच्या देखरेखीखाली आहे.

  आगीमुळे नष्ट झाला होता शनिवार वाडा

  > शहराच्या डेक्कन भागात 2 किलोमीटर अंतरावर असलेला हा वाडा सन 1818 पर्यंत पेशव्यांचे मुख्य स्थान राहिला. या महालरुपी किल्ल्याचा एक भाग 1824 मध्ये लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाला होता.

  या वाड्याला पाच दरवाजे आहे

  > शनिवार वाड्यात प्रवेश करण्यासाठी पाच दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजाला दिल्ली दरवाजा, क्रमाने मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा आहे. थरोलिया दीवान खाना, रंगमहाल आणि जूना आरसा महाल हे या वाड्याचे सगळ्यात महत्त्वाचे भाग आहे. शनिवारी आणि रविवारी या वाड्याला पाहाण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी असते.

Trending