आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी महिलेला लिफ्ट दिली, मग मित्रालाही बोलावले अन् ट्रिपल सीट नेऊन केला सामूहिक बलात्कार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यात एका परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला मूळची युगांडा येथील नागरिक आहे. तसेच ऑगस्टमध्ये ती भारतात टूरिस्ट व्हिसावर आली होती. पीडित महिला सोमवारी रात्री जेवणासाठी हॉटेलवर गेली होती. त्याच ठिकाणावरून परत येत असताना ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, युगांडाची नागरिक असलेली महिला कोंडवा येथे आपल्या बहिणीच्या घरी राहत होती. ऑगस्टमध्ये टूरिस्ट व्हिसावर भारतात आल्यानंतर तिने साड्या एक्सपोर्ट-इंपोर्टचा व्यवसाय सुरू केला होता. याच दरम्यान, सोमवारी रात्री ती जेवण्यासाठी एका हॉटेलवर गेली होती. जेवणानंतर बाहेर पडल्यानंतर ती ऑटोरिक्षाची वाट पाहत होती. याचवेळी एक टू-व्हीलरवर आलेल्या युवकाने तिला लिफ्ट ऑफर केली. महिला तिच्या गाडीवर बसली. परंतु, त्याने घरी नेणे सोडून तिला निर्जनस्थळी नेले आणि बलात्कार केला. यानंतर आरोपीने आपल्या मित्राला फोन करून घटनास्थळी बोलावले. तेथून आरोपी, त्याचा मित्र आणि पीडित महिला ट्रिपल सीट दुसऱ्या एका ठिकाणी गेला. येथे तिच्यावर दोघांनीही अत्याचार केले.

महिलेने अशी बोलावली मदत

दोघेही नराधम तिला हायवेच्या शेजारी असलेल्या जंगलांमध्ये सोडून जात होते. तेव्हा पीडितेने किमान हायवेवर तरी सोडा अशी विनंती केली. त्या दोघांनी पुन्हा तिला ट्रिपल सीट बसवून हायवेपर्यंत आणले. तेव्हा महिलेला लोक दिसून आले आणि तिने मदतीसाठी आरडा-ओरड सुरू केली. महिलेच्या हाकेवर लोक मदतीसाठी धावूनही आले. परंतु, तोपर्यंत नराधम घटनास्थळावरून पसार झाले होते. यानंतर मंगळवारी भल्या पहाटे विमानतळ पोलिसांनी बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...