पुणे / पुणे : बावधनमध्ये महिलेचा दारु पिऊन धिंगाणा, पोलिसांनाही केली अरेरावी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

महिलेने मद्यधुंद अवस्थेत नागिरकांच्या अंगावर कार घालण्याचा केला प्रयत्न - स्थानिकांचा दावा 
 

प्रतिनिधी

Aug 21,2019 04:32:00 PM IST

पुणे - बावधन येथील रामनगर परिसरात एका महिलेने सोसायटीच्या गेटजवळ काही गाड्यांना धडक दिली. त्यानंतर तेथे पार्क केलेल्या एका कारचे वारंवार ठोकर देत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. स्वाती सौरभ मिश्रा (रा. रामनगर कॉलनी, बावधन) असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दर्श सुभाष चावला (वय २८, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनाही केली अरेरावी
मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती मंगळवारी सकाळी आपल्या कारमधून घरी आल्या. दरम्यान त्यांच्या सोसायटीच्या गेटजवळील नॅनो कारला धक्का लागला. यावरून महिलेने रागाच्या भरात नॅनोला वारंवार ठोकरा दिल्या. सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस महिलेकडे विचारपूस करण्यास गेले असता महिलेने पोलिसांनाही अरेरावी केली.

नागरिकांच्या अंगावर कार घालण्याचा केला प्रयत्न
या महिलेवर मानसोपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे. मात्र, घटनेवेळी 'ही महिला मद्यधुंद अवस्थेत होती आणि तेथे गोळा झालेल्या नागरिकांच्या अंगावरदेखील तिने कार घालण्याचा प्रयत्न केला,' असा स्थानिकांचा दावा आहे. महिलेविरोधात पोलिसांता गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

X
COMMENT