आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने पुणे शहरातील 8 ही जागांवर उमेदवार जाहीर करून शिवसेना, आरपीआयला दिला भोपळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - 2014 मध्ये पुणे शहरातील आठही मतदारसंघात भाजपने कमळ फुलवले होते. त्यामुळे 2019 चा ही निवडणुकीत भाजपने 8 ही मतदारसंघात उमेदवार जाहीर करून शिवसेना-आरपीआयला (आठवले गटा) भोपळा दिल्याची चर्चा रंगली आहे. कोणत्याही परिस्थितीत या 8 मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ मित्र पक्षाला सोडण्यात येणार नसल्याचे भाजपचे पुणे प्रभारी आशिष शेलार, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी ठणकावून सांगितले होते. तरीही शिवसेना 2 तर, आरपीआय 1 जागा मिळणार, असा आशावाद व्यक्त करत होता. मात्र, भाजपने पहिल्याच यादीत मोठा धक्का दिला.

कसबा मतदारसंघातून लोकमान्य टिळक यांचा पनत सून, महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. शिवसेना हडपसर, शिवाजीनगर किंवा कोथरूडसाठी आग्रही होती. तर आरपीआयला पुणे कॅन्टोन्मेंट किंवा वडगावशेरी मतदारसंघ मिळण्याची अपेक्षा होती. या दोन्ही पक्षाची अपेक्षा फेल ठरली. शिवाजीनगर मतदारसंघात माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांचाही उमेदवारीला काही भाजप कार्यकर्त्यांचा विरोध आहे.

भाजपने पुण्यातील 3 आमदारांना दिला नारळ

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने पुण्यातील 3 विद्यमान आमदारांना 'नारळ' दिला. तर, कसबा मतदारसंघात धक्कादायक उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे सर्वच नगरसेवक नाराज झाले आहे. खासदार बापट यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. बापट यांचा स्नुषा स्वरदा या मतदारसंघात इच्छुक होत्या. स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर, नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासणे, प्रबळ दावेदार होते. कोथरूड मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातुन माजी मंत्री दिलीप कांबळे तर, शिवाजीनगर मतदासंघातून विजय काळे यांना 'नारळ' देण्यात आला आहे. विजय काळे यांचा विरोधात भाजपचाच कार्यकर्त्यांनी उघडपणे भूमिका घेतली होती. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापते वेळी मुलाला विधानसभेची उमेदवारी देणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

पुण्यातील मतदारसंघ आणि भाजप उमेदवार


1. शिवाजीनगर -सिद्धार्थ शिरोळे
2. कसबा - मुक्ता टिळक
3. पर्वती - माधुरी मिसाळ
4. कोथरूड - चंद्रकांत पाटील
5. कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे
6. खडकवासला - भीमराव तापकीर
7. वडगाव शेरी - जगदीश मुळीक
8. हडपसर - योगेश टिळेकर