Crime / पुण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा प्रियकराकडून खून, दुसऱ्या तरुणासोबत अफेअर असल्याचा होता संशय

एकाच कंपनीत काम करायचे, तीन महिन्यांपासून होता अबोला

प्रतिनिधी

Jun 12,2019 11:48:00 AM IST

पुणे - पुण्यातील चंदन नगर परिसरात एका विद्यार्थिनीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती बुधवारी सकाळी समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला तिचा प्रियकर सध्या फरार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने चंदननगर येथे राहणाऱ्या तरुणीच्या घरात घुसून मंगळवारी रात्रीच तिचा खून केला. पीडित तरुणी मूळची गोंदिया येथील रहिवासी असून ती पुण्यात शिक्षण घेतानाच नोकरी सुद्धा करत होती.


दुसऱ्या तरुणासोबत अफेअर असल्याचा होता संशय
गोंदियातील असलेली 22 वर्षीय तरुणी सीमा (काल्पनिक नाव) पुण्यात इंजिनिअरिंगच्या फायनर इयरला शिकत होती. याच दरम्यान तिला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली. याच कार्यालयात काम करणाऱ्या किरण शिंदेसोबत (25) तिची मैत्री होती. दोघांमध्ये प्रेम संबंध असल्याचीही चर्चा होती. गेल्या काही महिन्यांपासून सीमा दुसऱ्या एका तरुणाच्या संपर्कात आल्याचा संशय किशोरला होता. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्याशी अफेअर झाल्याच्या संशयावरून दोघांमध्ये भांडणही झाले. गेल्या 2-3 महिन्यांपासून दोघांमध्ये अबोला होता. याच दरम्यान आरोपी किशोर मंगळवारी तिच्या फ्लॅटवर गेला. याच ठिकाणी त्याने सीमावर धारदार शस्त्राने वार केले आणि घटनास्थळावरून पसार झाला. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत सीमाला उपचारासाठी चंदन नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच तिला मृत घोषित करण्यात आले.

X
COMMENT