वरात घेऊन नवरदेवाच्या / वरात घेऊन नवरदेवाच्या घरी पोहोचली बुलेटवाली दुल्हन, संपूर्ण गावासमोर घेतली सप्तपदी

मुली मुलांपेक्षा कमी नाहीत, हा यामागचा संदेश होता.

Jan 03,2019 04:41:00 PM IST

पुणे- दौंडमध्ये बुधवारी (ता.2) पार पडलेल्या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र चांगलीच रंगली आहे. नववधू बुलेटवून वरात घेऊन चक्क नवरदेवाच्या घरी पोहोचली आणि तिने संपूर्ण गावासमोर सप्तपदी घेतली. नववधूही शेतकरी कन्या आहे. वरात घेऊन येणे हा केवळ मुलांचाच हक्क नाही तर मुली काही कमी नाहीत, हाच उद्देश या मागे असल्याचे तिने सांगितले.

दौंडमधील केडगावातील कोमल देशमुख हिने नव्या नवरीच्या वेशभूषेत चक्क बुलेटवरून निघाली, हे पाहून सगळ्यांनाच वाटले. एखाद्या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे, असा भासही अनेकांना झाला होता. बुलेटवर बसलेल्या कोमलने लाल साडी नेसली होती. डोळ्यावर काळा गॉगल लावला होता. पुढे कोमलची बुलेट आणि तिच्या मागे अनेक सजलेल्या कारचा ताफा असे चित्र होते. कोमल हिने बुलेटवरुन 5 किलोमीटर अंतर पार करून ती लग्न मंडपात पोहोचली.

कोमलला वडिलांनी भेट केली बुलेट...

कोमलच्या वडिलांनी तिला बुलेट गिफ्ट केली आहे. कोमलच्या वडिलांनी सांगितले की, कोमलला बुलेट चालवायची आवड आहे. विवाह स्थळी नव्या कोर्‍या बुलेटवरून जाण्याची इच्छा कोमलने व्यक्त केली होती. बुलेटस्वार नववधू मंडपात पोहोचताच तिचे सगळ्या पाहुण्यांनी जोरदार स्वागत केले.

पुढील स्लाइडवर पाहा बुलेटवाल्या दुल्हनचे इतर फोटोज...

X