आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे मिरवणुकीनंतर विसर्जन; भक्तीमय वातावरणात बाप्पाला दिला निरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती - Divya Marathi
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती

पुणे - शहरातील मनाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली होती. महापौर मुक्ता टिळक आणि खासदार गिरीश बापट, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मनाच्या कसबा गणपतीची आरती करून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यासोबत पुणे पोलिसांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा आणि त्यासंदर्भातील तयारीचे ड्रोन व्हिडिओ जारी केले आहेत. मिरवणुकीनंतर भक्तिमय वातावरणात पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. 
 
मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला 10.30 वाजल्यापासून सुरुवात झाली होती. यावेळी गणरायासाठी चौका-चौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्व मार्गाने पायघड्या आणि ध्वजमय वातावरण झाले. याच दरम्यान राणी लक्ष्मीबाई मुलींची शाळा यांच्या वतीने मुलींकडून मल्लखांबचे प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आले . शहरातील गणेश विसर्जनसाठी खडकवासला धरणातून सकाळी 11 पासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. रात्री 1700 क्यूसेक असलेला विसर्ग सकाळी 11 वाजता 3400 क्यूसेक करण्यात आला होता. 
 
> मानाच्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन 
> मानाच्या पाच गणपतींपैकी पहिला कसबा गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन 
 

मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी रवाना 
मानाचा पहिला कसबा गणपती दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी टिळक चौकातून महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ स्वीकारून विसर्जनासाठी रवाना झाला होता. फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरासाठी सुमारे 5 तास लागले होते. . 
 
 

बातम्या आणखी आहेत...