आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या ‘एमबीए’ तरुणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यू, घरात एकटीच असताना गळा दाबून केला खून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सिंहगड रोड परिसरात माणिकबाग भागातील एका घरात तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेजसा श्‍यामराव पायाळ (वय २९ वर्षे, मूळ रा. बीड) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमाही आहेत. तिच्यावर अत्याचार झाले का, याचा खुलासा शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच हाेईल. तिच्या घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. घटनास्थळी काही मद्याच्या बाटल्याही आढळून आल्याचे पाेलिसांनी सांगितले. 

साेमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तेजसाचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मंगळवारी शवविच्छेदनात तिचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. तेजसा ही बीडच्या पालवण राेडवरील पंचशीलनगरमध्ये राहत हाेती. एमबीए पदवी घेतलेली तेजसा नाेकरीच्या शाेधात पुण्यात आली हाेती. पुण्यात ती आई व दोन बहिणींसह किरायाने फ्लॅटमध्ये राहत हाेती. १२ नाेव्हेंबरला ती कुटुंबीयांसह बीडमध्ये गेली हाेती. एकटीच परतली होती...


१५ नाेव्हेंबरला तेजसा एकटीच पुण्यात परतली. साेमवारी एका व्यक्तीने पाेलिसांना फाेन करून तिचा मृतदेह घरात असल्याची माहिती दिली. तेव्हा ती गादीवर मृतावस्थेत आढळली. तर पंख्याच्या हुकाला ओढणी बांधल्याचे आढळून आले. बेडरूमचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत होता.