Home | Maharashtra | Pune | pune girl minashri patil open challenge to bjp mla ram kadam

राम कदम मी मुंबईत येतेय...बोट तर लावून दाखवा; पुण्‍याच्‍या तरूणीचे BJP आमदाराला ओपन चॅलेंज

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 05:19 PM IST

सोशल मीडियावरून राम कदमांची चांगलीच खिल्‍ली उडवली जात आहे तर काही तरूणी हात तर लावून दाखवा, असे ओपन चॅलेंज त्‍यांना देत

  • pune girl minashri patil open challenge to bjp mla ram kadam

    पुणे- दहीहंडी उत्‍सवात महिलासंबंधी केलेल्‍या बेताल वक्‍तव्‍यावरून भाजप आमदार राम कदमांवर चहुबाजूकडून टीका होत आहे. सोशल मीडियावरून राम कदमांची चांगलीच खिल्‍ली उडवली जात आहे तर काही तरूणी हात तर लावून दाखवा, असे ओपन चॅलेंज त्‍यांना देत आहे. असाच एक व्हिडिओ सध्‍या चांगलाच व्‍हायरल होत आहे. या व्हिडिओत पुण्‍याची तरूणी मिनाक्षी पाटीलने राम कदमांना आमनेसामने या, मला तुमच्‍या दाव्‍याची शहानिशा करायची आहे, असे जाहीर आव्‍हान दिले आहे.

    व्हिडीओत मीनाक्षी म्हणते, 'जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्रशंभू. मी मीनाक्षी पाटील पुण्याहून बोलतेय. काल घाटकोपरमधल्या दहीहंडी उत्सवामध्ये राम कदम यांनी एक वक्तव्य केले होते. तुम्हाला मुलगी आवडली की मला एक कॉल करा, मी तिला उचलायला मदत करतो. राम कदम तुम्हाला मी चॅलेंज करतेय. मला तुम्ही मुंबईमध्ये बोलवा किंवा मी मुंबईमध्ये येते. मला तुम्ही फक्त एक बोट लावून दाखवा. बाकी पुढचं उचलून नेण्याची गोष्ट मी नंतर बघते, तुमच अत्यंत लांच्छनास्पद आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. इथं स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या असल्या घाणेरड्या वक्तव्यांची इथे महाराष्ट्रामध्ये जागा नाहीये. तुम्ही ज्या काही प्रकरणावर बोललेला आहात ना, मला त्याची शहानिशा करायची आहे. भेटूयात आपण आमने सामने, तुमच्या फोनची मी नक्कीच वाट बघेन, आजपर्यंत तुम्हाला मी खूप कॉल केले होते. याच्या आधीच्याही तुमच्या काही वक्तव्यांवर कॉल केले होते. शिवाय आताही मी कॉल केले . पण तुम्ही कॉलचं उत्‍तर दिलेल नाहीए. आता प्रतीक्षा मला तुमच्या कॉलची आहे. सर, नक्की कॉल करा मला, तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. हे चॅलेंज तुम्ही स्वीकारावं ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद..'

Trending