आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात हाय प्रोफाईल सेक्‍स रॅकेट; पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांचा छापा, विदेशी तरूणीची सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शहरातील अापटे रस्त्यावरील पंचतारांकित रॅमी ग्रॅंड हाॅटेल मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेले सेक्स रॅकेट सामाजिक सुरक्षा विभागाच्या छाप्यामुळे उघडकीस अाले अाहे. पाेलीसांनी 27 वर्षीय उजबेकिस्तान देशातील परदेशी तरुणीची वेश्याव्यवसायातून सुटका केली असून तिला हडपसर येथील सुधारगृहात ठेवण्यात अाले अाहे.


याप्रकरणी दाेनजणां विराेधात पाेलीसांनी डेक्कन पाेलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांनी दिली अाहे. संबंधित हाॅटेल मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली परदेशी महिलेस पैशांचे अमिष दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पाेलीसांना मिळाली हाेती.

 

 

बातम्या आणखी आहेत...