आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहण्यासाठी पुणे देशात सर्वाेत्तम शहर, नाशिक २१ व्या स्थानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ नाशिक- 'पुणे तेथे काय उणे' ही उक्ती पुणे शहराने सार्थ ठरवली आहे. राहण्यासाठी सर्वाेत्तम शहर म्हणून पुण्याला पहिला तर नाशिकला २१ वा क्रमांक मिळाला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने प्रथमच इझ ऑफ लिव्हिंग म्हणजेच जगण्यासाठी सुगम अशा देशातील १११ शहरांची यादी जारी केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ८ शहरे आहेत. टॉप -१० मध्ये ४ शहरे महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीचा क्रमांक तब्बल ६५ वा आहे. 


या यादीत उत्तर प्रदेशातील रामपूर शहर या यादीत सर्वात शेवटच्या स्थानी आहे. देशातील ११६ मोठ्या शहरांपैकी कोलकात्याने या सर्वेक्षणात सहभागी होण्यास नकार दिला होता. इतर प्रमुख शहरांपैकी चेन्नई १४, अहमदाबाद २३, हैदराबाद २७ स्थानी आहे. उत्तर प्रदेशातील एकही शहर टॉप-१० मध्ये नाही. 


प्रत्येक शहरात ६० हजार लाेकांचे सर्वेक्षण 
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप पुरी म्हणाले, शहरांना १० हजार कागदपत्रे जमा करायची होती. तसेच १४ हजारांपेक्षा जास्त युनिट्सचे प्रत्यक्ष परीक्षण करायचे होते. प्रत्येक शहराला ६० हजारांवर नागरिकांचे सर्वेक्षण करायचे होते. कव्हरेजच्या आधारावरील हे असे पहिलेच वैश्विक सर्वेक्षण आहे. 


या १० शहरांत राहणे अवघड
111. रामपूर, 110. कोहिमा, 109. पाटणा, 108. बिहार शरीफ, 107. भागलपूर, 106. इटानगर, 105. पासीघाट, 104. कवरत्ती, 103. सहारनपूर, 102. सिल्व्हासा. 


राज्यातील ८ शहरे यादीत, टॉप-१० मध्ये राज्यातील ४ शहरे 
1. पुणे 
2. नवी मुंबई 
3. बृहन्मुंबई 
4. तिरुपती 
5. चंडिगड 
6. ठाणे 
7. रायपूर 
8. इंदूर 
9. विजयवाडा 
10. भोपाळ 


असे झाले सर्वेक्षण
१० लाखांवरील लोकसंख्येच्या शहरांत चार विषयांवर केली ७८ मुद्द्यांची पडताळणी 
सर्व्हेत सामान्य नागरिकाचे आयुष्य सुगम व सुसह्य करणारे उपाय व सुविधांची पडताळणी करण्यात आली. शहरात प्रशासन, सामाजिक घडण, आर्थिक स्थिती आणि प्रत्यक्ष पायाभूत सुविधा हे सुगम जीवनाचे ४ आधारभूत घटक मानले. स्थानिक गरजांची पूर्तता करताना जागतिक पातळीवरील सुविधांच्या आधारे शहरांचे आकलन करण्यात आले. हे ३ घटक १५ श्रेणी व ७८ मुद्द्यांवर विभागले. ७८ मुद्द्यांसाठी १०० गुण ठरवले. प्रशासन व सामाजिक घडणीसाठी २५-२५ गुण, आर्थिक स्थितीसाठी ५ व प्रत्यक्ष पायाभूत सुविधांसाठी ४५ गुण होते. देशातील महानगरे व १० लाख लोकसंख्येवरील शहरांत सर्वेक्षण केले गेले. 


बनारस ३३, तर रायबरेली ४९ व्या स्थानी 
इझ आॅफ लिव्हिंग इंडेक्सनुसार, पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ बनारस ३३ व्या स्थानी आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचा रायबरेली मतदारसंघ ४९ व्या स्थानी आहे. अलीगड ८६, गुरुग्राम ८८, पणजी ९०, जम्मू ९५, श्रीनगर १००, मीरत १०१ व्या स्थानी आहे. गाझियाबाद ४६ व्या क्रमांकावर आहे. 

बातम्या आणखी आहेत...