आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतांच्या नातेवाईकांना भाजपकडून 5 लाखांची मदत तर जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा सर्व खर्च भाजप करणार- चंद्रकांत पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - वारकरी दिंडीत जेसीबी घुसून झालेल्या अपघातात 2 वारकरी ठार तर 15 जण जखमी झाले. त्यानंतर आता मृतांच्या नातेवाईकांना भाजपकडून 5 लाखांची मदत जाहिर करण्यात आली आहे. तसेच, जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च भाजप करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. जखमी वारकऱ्यांना भेटण्यासाठी ते रुग्णालयात आले. आज सकाळी पुण्याजवळीव दिवे घाटात ही घटना घडली. या अपघाता संत नामदेव महाराजांचे वंशज सोपन महाराज नामदास यांचा मृत्यू झाला आहे. 

ब्रेक फेल झाल्यामुळे घडला अपघात


नामदेव महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरवरून आळंदीला येत होता. दरम्यान दिवे घाटात एक जेसीबी ब्रेक फेल झाल्याने या दिंडीत घुसला. या अपघातात नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास (वय 36) आणि अतुल महाराज आळशी (वय 24) या दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमींनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...