आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होणाऱ्या बायको अन् सासूच्या भांडणांवर संतापून त्याने दोघींवरही केला धारदार शस्त्राने हल्ला; भावी पत्नीचा जागीच मृत्यू, सासू गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येथील फरासखाना गणेश पेठ परिसरात दोन महिलांवर मंगळवारी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी महिला सध्या गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यातील आरोपीला पोलिसांनी वेळीच अटक केली असून तो पीडित महिलेचा होणारा पतीच निघाला. किरकोळ वादातून सुरू झालेले खुनापर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


फरासखाना परिसरात राहणारा 18 वर्षीय शरीफ रझाक शेख याचा विवाह नाझनीन सादिक शेख (18) हिच्याशी ठरला होता. लग्नासाठी तयाऱ्या देखील सुरू होत्या. परंतु, नाझनीनची आई हमीदा (45) आणि नाझनीनमध्ये पटलेच नाही. किरकोळ गोष्टीवरून या लोकांमध्ये वाद सुरू झाला. पाहता-पाहता वाद इतका वाढला की संतापाच्या भरात शरीफने हमीदा आणि होणाऱ्या पत्नी या दोघींवरही धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात नाझनीनचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई हमीदा हिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांच्या तावडीत असलेल्या शरीफची सध्या कसून चौकशी सुरू आहे.