आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक पोस्टमध्ये लिहिले 'खऱ्या प्रेमाचा अंत होत नाही' आणि नदीत उडी घेत संपवले जीवन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे
  • या पोस्टमध्ये त्याने चॉकलेट, केक आणि अंगठीचा फोटो देखील शेअर केला होता

पुणे - पुण्यातील इंदौरी भागातील एका युवकाने फेसबुकवर 'खऱ्या प्रेमाचा अंत होत नाही, प्रेम कधी संपतच नाही' पोस्ट लिहिली आणि इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या पोस्टमध्ये त्याने चॉकलेट, केक आणि अंगठीचा फोटो शेअर केला होता. समीर एकनाथ भासे (वय 25) असे युवकाचे नाव आहे. समीरजवळून एक सुसाइड नोट मिळाली, यामध्ये त्याच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नका असे लिहिले आहे. 

 

6 तासांच्या प्रयत्नानंतर मिळाला मृतदेह


समीरने आपल्या इन्स्टाग्रामवर देखील आपला शेवटचा संदेश लिहिला होता. समीरने प्रेमात आलेल्या अपयशामुळे हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी मानले असून पुढील तपास करत आहेत. समीर रविवारी सकाळी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडला होता. यानंतर त्याने पुलावरून इंद्रायणीत उडी घेतली. दरम्यान त्याला उडी मारताना पहिल्यानंतर काही लोकांना वाचवण्याच प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवास जोरात असल्याने त्याला बाहेर काढता आले नाही. अखेर एनडीआरएफला याबाबत माहिती देण्यात आली. 6 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर समीरचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.  समीरने सुसाइड नोटमध्ये लिहिले की... 


'मी समीर एकनाथ भासे आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. मी स्वच्छेने आत्महत्या करत आहे. मला आत्महत्या करण्यासाठी कोणाही भाग पाडले नाही. हा माझा निर्णय आहे. आजोबा, आई मला माफ करा, मी तुम्हाला सोडून जात आहे.'