आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन व्हिस्की मागवणे महागात; २६ हजारांचा गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ऑनलाइन व्हिस्की मागवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. दारूचे पैसे देण्याच्या नावाखाली भामट्यांनी डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन या तरुणाच्या बँक खात्यातून २६ हजार ६५२ रुपये परस्पर काढून घेतले.
याप्रकरणी दिव्येश जयेशकुमार पाठक (रा. हडपसर, पुणे) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी अॅक्‍टनुसार अज्ञात व्यक्तीविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी रात्री दिव्येशला व्हिस्की पिण्याची इच्छा झाली हाेती, मात्र जवळपासचे वाइन शाॅप बंद हाेते. मगरपट्टा हडपसर येथील सनी वाइन शॉप सुरू असल्याचे त्यांना समजले. त्यांनी संबंधित नंबरवर संपर्क केला असता समोरील व्यक्तीने शॉप बंद झाले आहे, होम डिलिव्हरी मिळेल, असे सांगितले.  पेमेंटसाठी डेबिट कार्ड आणी मोबाइलवर आलेला ओटीपीची माहिती काढून घेतली. या माहितीच्या अाधारे समाेरील व्यक्तीने दिव्येशच्या खात्यातून २६,६५२ रुपये काढून घेतले. फिर्यादीला पैसे निघाल्याचा बँकेचे मेसेज आल्यावर त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. मात्र ताे क्रमांक बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 
 

अशी झाली फसवणूक

होम डिलिव्हरीसाठी संबंधित व्यक्तीने दिव्येशला डेबिट कार्ड रजिस्टर करण्यास सांंगितले. त्याने एटीएम कार्डवरील नंबर सांगितल्यावर त्यांच्या खात्यातून १८५० रुपये समोरील व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर झाले. मात्र त्यानंतर समोरील व्यक्तीने डिलिव्हरी बॉय नसल्याचे सांगत घरपाेच दारू पाेहाेचवण्यात असमर्थता दर्शवली. तसेच तुमचे पैसे परत खात्यावर जमा करण्यासाठी दिव्येशला माेबाइलवर आलेला ओटीपी देण्यास सांगितले. दिव्येशने ओटीपी सांगितल्यावर पुन्हा ९९०१ रुपये काढून घेण्यात आले. पुन्हा आराेपीने दिव्येशला दुसरा ओटीपी नंबर शेअर करण्यास सांगितले. यानंतर पुन्हा त्यांच्या खात्यातून ९९०१ रुपये काढून घेतले. या प्रकारे दिव्येशला २६ हजार रुपयांचा फटका बसला.

बातम्या आणखी आहेत...