पुणे / पंचगनीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये 11 आदिवासी अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

  • विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला
  • 11 मुले शाळेची भिंत ओलांडून पळून जात असताना हे प्रकरण उघडकीस आले

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 11:40:00 AM IST

पुणे - राज्यातील हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंचगनी येथील एका बोर्डिंग स्कूलमध्ये 11 आदिवासी विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

असा उघडकीस आला प्रकार


11 मुले शाळेची भिंत ओलांडून पळून जात असताना या प्रकरणाचा खुलासा झाला. मुले शाळा सोडून पळून जात असताना स्थानिक लोकांनी त्यांना अडवले आणि याबाबत कारण विचारले. यानंतर मुलांनी शाळेत घडत असलेला सर्व प्रकार सांगितला. लोकांनी फोनवरून मुलांच्या कुटुंबीयांना संबंधित माहिती दिली आणि पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाची तपास करत आहेत.

असा आहे विद्यार्थ्यांचा आरोप


पंचगनी पोलिस स्टेशनचे मुख्य अधिकारी या मुलांना सातारा येथील निरीक्षण गृहात घेऊन गेले आहेत. तेथे बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आणि जिल्ही प्रशासनाने मुलांची चौकशी केली. यावेळी मुलांनी सांगितले की, शाळेतील शिक्षक आणि शाळा प्रशासन त्यांना त्रास देत असून त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते.

काही विद्यार्थ्यानी सांगितले की, एक माणूस रात्री त्यांच्या पांघरुणात घुसतो आणि अश्लिल चाळे करतो. काही मुले म्हणाले की, त्यांनी जेवण दिले जात नव्हते. तर कधी उष्टे जेवण दिले जात होते.

X
COMMENT