आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात गंभीर स्वरूपाच्या घरफोडी व जबरी चोरी करत धुमाकूळ घालणारे गुन्हेगार जेरबंद; तब्बल 81 लाखांचा माल हस्तगत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे शहरासह परिसरात चोरट्यांनी चोरी आणि घरफोडी करत धुमाकूळ घातला होता. अखेर या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 81 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. 

वानवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. या पाच आरोपींपैकी दोघांना 21 ऑगस्ट रोजी पुण्यातून तर इतर दोघांना धुळे येथून अटक करण्यात आली. चोरीचा माल विकत घेणाऱ्या एका सराफास  पुण्यातून अटक केली. दरम्यान या कारवाईत ५० गुन्हे उघडकीस आले असून सुमारे १ किलो सोन्याचे दागीणे आणि सुमारे १० किलो चांदीचे दागिने व वस्तू, एक लायसन्स इम्पोरटेड पिस्टल व ०६ जिवंत राऊंड, ०६ चारचाकी गाड्या, ०१ मोटरसायकल, घरफोडीचे साहित्य, बनावट नंबर प्लेट असा एकुण 81 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सर्व आरोपी पुण्यातील रहिवासी 
उजालासिंग प्रभुसिंग टाक (२७ वर्षे), गोरखसिंग गागासिंग टाक (29 वर्षे), बल्लूसिंग प्रभुसिंग टाक (30 वर्षे), जलसिंग रजपुतसिंग दुधानी (26 वर्षे) सर्व रा.रामटेकडी हडपसर पुणे, सत्यनारायण देवीलाल वर्मा (43 वर्षे) रा.लोणिकाळभोर पुणे, यांना पोलिसांनी जेरबंद केले. 

बातम्या आणखी आहेत...