Home | Maharashtra | Pune | pune police raids stan swamy home in jharkhand in alleged bhima koregaon case connection

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणः फादर स्टॅन स्वामींच्या झारखंड येथील घरावर पुणे पोलिसांचा छापा

वृत्तसंस्था, | Update - Jun 12, 2019, 12:19 PM IST

स्टॅन स्वामींच्या घरातून डिजिटल डिव्हाइससह इतर साहित्य जप्त

  • pune police raids stan swamy home in jharkhand in alleged bhima koregaon case connection

    पुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी झारखंडमध्ये फादर स्टॅन स्वामी यांच्या घरावर छापा टाकला. पुणे पोलिसांनी बुधवारी सकाळी ही कारवाई केली. पोलिस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी स्टॅन स्वामींच्या घरातून डिजिटल डिव्हाइस आणि इतर काही साहित्य जप्त केले अशी माहिती दिली. पुण्यातील एल्गार परिषदेवर बंदी नंतर माओवाद्यांशी संपर्क असल्याच्या संशयावरून 5 जणांना अटक केली. त्यावेळी सुद्धा पोलिसांनी स्टॅन यांच्या घरावर छापा टाकला होता. परंतु, तेव्हा स्टॅन स्वामींना अटक करण्यात आली नव्हती.


    भीमा कोरेगाव येथे 2018 मध्ये हिंसाचार झाला होता. त्याच हिंसाचाराच्या काही दिवसांपूर्वी एल्गार परिषदेने कथितरित्या बैठक घेऊन चिथावणी दिली होती असा आरोप आहे. एल्गार परिषदेचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अनेकांना अटक केली. त्यांच्याच चौकशीत फादर स्टॅन स्वामी यांचे नाव आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला असे सांगितले जात आहे. या कारवाईत पुणे पोलिसांना झारखंड पोलिस देखील मदत करत आहे.


    कोण आहेत स्टॅन स्वामी?
    मूळचे केरळचे असलेले फादर स्टॅन स्वामी गेल्या 50 वर्षांपासून झारखंडच्या चायबसा येथे आदिवासी संघटनांसाठी काम करतात. 2004 मध्ये बिहार राज्याच्या विभाजनानंतर झारखंडची निर्मिती झाली. तेव्हा ते रांची येथे राहायला आले. आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या स्वामींनी 'नामकुंम बगेईचा' या संस्थेसाठी देखील काम केले. नक्षलवाद्यांचा ठपका ठेवून तुरुंगात डांबण्यात आलेल्या आदिवासींची ते मदत करतात.

Trending