Home | Maharashtra | Pune | pune police will be give gift vouchers for drivers

पुण्यात सुजाण चालकांना पोलिस देणार गिफ्ट कुपन; हाॅटेल, दुकानांत खरेदीवर मिळेल १० टक्क्यांपर्यंत सूट

प्रतिनिधी, | Update - Jun 14, 2019, 09:05 AM IST

७० लाख लोकसंख्येच्या पुण्यात दररोज वाहतूक नियम माेडल्याच्या ३ हजारांवर केसेस दाखल होतात

 • pune police will be give gift vouchers for drivers

  पुणे - वाहतूक नियम पाळणाऱ्या सुजाण नागरिकांसाठी पुणे पाेलिसांनी ‘आभार याेजना’ सुरू केली असून वाहनचालकांना गिफ्ट कुपन मिळणार आहेत. त्यावर चालकांना हाॅटेलिंग वा दुकानातील खरेदीवर १० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. चालकांना किमान १०० रुपयांपर्यंत सवलतीचा लाभ घेता येईल. ७० लाख लोकसंख्येच्या पुण्यात दररोज वाहतूक नियम माेडल्याच्या ३ हजारांवर केसेस दाखल होतात. शहरात २७ लाखांवर दुचाकी तर १३ लाखांवर चारचाकी वाहने आहेत.

  अशी योजना
  वाहतुकीचे नियम पाळणारे, हेल्मेट- लायसन्स बाळगणारे आणि ज्यांच्यावर वाहतूक नियम माेडल्याचे कोणतेही चालान-केस नाही अशा चालकांना प्राेत्साहन म्हणून पुणे शहरातील सुमारे १३५ दुकाने, हाॅटेल अास्थापनांत १०% सूट देणारे डिस्काउंट कुपन दिले जाईल.

  अशी होणार अंमलबजावणी
  पुण्यात २४ जागी नाकेबंदी केली जाते. करण्यात येत आहे. वाहतूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालकांच्या वाहनांची पडताळणी हाेऊन ही गिफ्ट कुपन्स दिली जातील.

  असे मिळेल कुपन : ‘नाकेबंदी अॅप’मध्ये वाहन क्रमांक टाकून वाहनावर वाहतूक नियमभंगाची किती प्रकरणे आहेत याचा डाटा समोर येईल. तो निष्कलंक असल्यास अधिकारी त्याच्या माेबाइलवर एसएमएसद्वारे गिफ्ट कुपन असलेला कोड पाठवतील.

  असे वापरा कुपन : दुकानदारांना ‘व्हेंडर अॅप’ देण्यात आले आहे. चालक खरेदीस गेल्यानंतर कुपन रीडिम करू शकतील. या कुपनची वैधता महिनाभरापर्यंत असेल.

Trending