Maharashtra Crime / पुणे रेल्वे पोलिसांनी 3 किलो सोन्यासह दोघांना पकडले, आंतरराष्ट्रीय बाजारात 1 कोटी किंमत


चौकशीदरम्यान त्यांना सोन्याबाबत काहीच उत्तरे देता आली नाही

दिव्य मराठी

Aug 06,2019 04:58:35 PM IST

पुणे- रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत स्टेशनवर 2 व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2.97 किलोग्राम सोने जप्त करण्यात आले आहे. ते दोघे चेन्नईवरुन येत होते, पोलिसांनी त्यांना पकडल्यावर चौकशी केली असता, त्यांच्याकडे सोने खरेदीचे डॉक्यूमेन्ट्स नव्हते, तसेच त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला आणि त्यांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, उदयलाल गोवर्धन गुज्जर(वय 32) आणि सागर जम्नालाल जट्ट(19) हे दोघे चेन्नईवरुन आले होते. पुणे स्टेशनवर आल्यावर त्यांची रेल्वे पोलिसांनी चौकशी केली आणि त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 2.97 किलोचे दागिने आढळले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारत 1 कोटी रुपये किंमत आहे. पोलिसांनी याबाबत त्यांना विचारले असता, त्यांच्याकडे सोने खरेदीची पावती नव्हती आणि त्यांना या सोन्याबाबत समाधानकारक उत्तरेही देता आली नाही. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत हे सोने आयकर विभागाकडे सोपवले आहेत. आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे.

X