आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Livabilty Index: राहण्यासाठी पुणे देशात नंबर एक; Top 10 शहरांमध्ये 4 महाराष्ट्राचे, केंद्र सरकारचा सर्व्हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ औरंगाबाद- ‘पुणे तेथे काय उणे’ ही उक्ती पुणे शहराने सार्थ ठरवली आहे. राहण्यासाठी देशभरातील सर्वाेत्तम शहर म्हणून पुण्याला पहिला क्रमांक मिळाला आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने प्रथमच इझ ऑफ लिव्हिंग म्हणजेच जगण्यासाठी सुलभ अशा १११ शहरांची यादी जारी केली आहे. त्यात महाराष्ट्रातील १२ शहरांचा समावेश आहे. टॉप -१० मध्ये राज्यातील ४ शहरे आहेत. देशाची राजधानी दिल्ली ६५ व्या स्थानी तर राज्याची पर्यटन राजधानी औरंगाबादने पार तळाचे म्हणजे ९७ वे स्थान गाठले आहे. कचरा व्यवस्थापनासह विविध निकषांवर औरंगाबाद शहर सपशेल फेल ठरले आहे. शहराला १०० पैकी केवळ २४.२ गुण मिळाले. घनकचरा व्यवस्थापनासह अनेक नागरी सुविधांच्या मुद्द्यांवर शहराला चक्क शून्य गुण मिळाले आहेत. 
 
 
यूपीतील रामपूर सर्वात शेवटी १११ व्या स्थानी आहे. कोलकाता सर्व्हेत सहभागी झाले नाही. चेन्नई १४, अहमदाबाद २३, हैदराबाद २७ व्या स्थानी आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी म्हणाले, शहरांना १० हजार कागदपत्रे जमा, १४ हजारांवर युनिट्सचे परीक्षण करायचे होते. प्रत्येक शहराला ६० हजारांवर नागरिकांचे सर्वेक्षण करायचे होते. 
 
 
टाॅप १० शहरे
1. पुणे
2. नवी मुंबई
3. बृहन्मुंबई
4. तिरुपती
5. चंदिगड
6. ठाणे
7. रायपूर
8. इंदूर 
9. विजयवाडा
10. भोपाळ
 
 
अाैरंगाबादपेक्षा अमरावती, नाशिक, साेलापूर ठरले सरस
16. अमरावती 
20. वसई-विरार
21. नाशिक
22. सोलापूर
31. नागपूर
50. कल्याण- डोंबिवली 
69. पिंपरी - चिंचवड
97. औरंगाबाद  
 
देशातील १११ शहरांमध्ये असे झाले सर्वेक्षण
> राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील राहण्यायोग्य शहरांच्या आणि शाश्वत विकासाच्या मानांकनांच्या आधारावर सुलभ जीवन निर्देशांकाचे (इझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स) मूल्यांकन केले. 
> संस्थात्मक (२५ गुण), सामाजिक (२५), आर्थिक (५), भौतिक (४५) हे ४ मुख्य निकष आहेत. त्यात १५ श्रेणींची वर्गवारी आणि ७८ संकेतांक दिले आहेत. ७८ संकेतांकांना १०० गुण होते. 
 
 
पिछाडलेले औरंगाबाद या शहरांपेक्षा ‘पुढे’ : 
111. रामपूर, 110. कोहिमा, 109. पाटणा, 108. बिहार शरीफ, 107. भागलपूर, 106. इटानगर, 105. पासीघाट, 104. कवरत्ती, 103. सहारनपूर, 102. सिल्व्हासा.
 
ड. भौतिक : 5.14 गुण (11%)
- गृहनिर्मिती व सर्वसमावेशकता - 0.00 
- सार्वजनिक वापराची खुली जागा - 0.01 
- मिश्र जमीन वापर व नेटकेपणा - 0.00 
- वाहतूक व्यवस्था व मोबिलिटी - 0.83
- खात्रीशीर पाणीपुरवठा सुविधा - 0.37
- सांडपाणी व्यवस्थापन -  0.67
- घनकचरा व्यवस्थापन -         0.00
- शहरातील प्रदूषण निर्मूलन - 1.75 
- अव्याहत वीजपुरवठा - 1. 51
(प्रत्येक मुद्द्याला 5 पैकी गुण)


हा आहे यादी जाहीर करण्याचा हेतू
पुरी यांनी सांगितल्याप्रमाणे, सरकार सामान्य माणसाचे आयुष्य सहज आणि सोपे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी त्या-त्या राज्यातील सरकारांना वित्तीय आणि औद्योगिक सहायता केली जात आहे. सरकारने आयुष्य सहज बनवण्याच्या हेतूने 'सुगम जीवन' मोहिम आखली. त्यातून देशभरात सर्व्हे करण्यात आला आहे. यात शहरांमध्ये स्पर्धा आयोजित करून त्यांना आणखी सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे. 


चार निकषांवर झाला सर्व्हे
शहरांचे मूल्यमापन करण्यासाठी 4 निकष ठेवण्यात आले होते. त्यामध्ये  संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक आणि भौतिक परिस्थितींचा समावेश होता. यातही 15 प्रकारचे वर्गीकरण आणि 78 सूचक होते. सर्वच 78 सूचकांना 100 गुण होते. संस्थात्मक आणि सामाजिक निकषांसाठी प्रत्येकी 25-25 गुण ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे, भौतिक परिस्थितींसाठी 45 आणि आर्थिक निकषांसाठी 5 गुण ठेवण्यात आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...