आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोळकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा सदस्य विक्रम भावे याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडात सीबीआयद्वारे अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा सदस्य विक्रम भावेचा जामीन अर्ज शनिवारी पुणे न्यायालयाने फेटाळून लावला. भावे आणि मुंबईतील वकील संजीव पुनाळेकर यांना मे 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळी घालून हत्या केली होती.  

विक्रम भावे आणि वकिल संजीव पुनाळेकर यांनी डॉ.नरेंद्र दाभोळकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडात वापरण्यात आलेली बंदूक नष्ट करण्यात मदत केल्याचा आरोप आहे. तसेच हे दोघे कथित आरोपींच्या संपर्कात होते. या बंदूकीला अरबी समुद्रात बुडवण्याचा प्रयत्न केला होता. 

ठाणे बॉम्बस्फोटात आरोपी होता भावे
सीबीआयने न्यायालयात सांगतिले, की भावेने कथितरित्या हल्लेखोरांची मदत केली आणि दाभोळकर यांना गोळी मारण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी केली होती. यापूर्वी ठाणे बॉम्बस्फोट प्रकरणी विक्रम भावे विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 2013 मध्ये जामिनावर त्याची सुटका केली होती. 
 

बातम्या आणखी आहेत...