आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेः मावळमध्ये सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्यास बेदम मारहाण, परस्पर विरोधी तक्रारी दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी दावेदार सुनील शेळके यांच्या कल्पेश मराठे या जवळच्या कार्यकर्त्याला वराळे येथे मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली असून यामध्ये मोटारीतून आलेल्या तरुणांनी पाईप आणि लोखंडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी तळेगाव पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे देखील दाखल करण्यात आले. त्यावरच सुनील शेळके यांनी या प्रकरणी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर आरोप केला. तसेच मावळची जनता दादागिरी व दडपशाही खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. शेळके यांचे गावभेट कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भेगडे यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

दरम्यान कल्पेश मराठे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वांनी १२ वाजेपर्यंत पायोनियर हॉस्पिटलसमोर पोलिस प्रशासनाचा विरोधात रास्ता रोको करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहान सुनिल शेळके यांनी केले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...