आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident : पुणे-ताम्हिणी मार्गावर भरधाव ट्रकने दोन दुचाकींना उडवले; 4 जण ठार तर 1 गंभीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे-ताम्हिणी मार्गावर भरधाव ट्रकने दोन दुचाकींना उडवले. मंगळवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेदरम्यान हा अपघात घडला. यात चार ठार तर एक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांकडून समजले आहे. 

पिरंगुट घाटातून भरधाव वेगाने खाली आलेल्या मालवाहू ट्रकने (MH15, GV9011) राससोनी हॉटेलसमोर एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एक जण ठार तर एक जखमी झाला. ट्रकने पुढे जाऊन दुसऱ्या एका दुचाकीला उडवले. यात एक मुलगा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला. जखमींची प्रकृती गंभीर आहे. मयतांमधील दोन महिला रहाटणी, पिंपरी-चिंचवड परिसरातील असल्याचे समजले आहे. ट्रकचालक दारुच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांकडून कळाले. 
या अपघातातील मृतांमध्ये पूजा बंडू पाटील (वय-17 ,रा.पिरंगुट, मुळशी ,पुणे), वैष्णवी सुनील सोनावणे (वय-20, रा.पौड, ता.मुळशी,पुणे), नागेश अंकुश गव्हाणे ( वय-21, रा.पिरंगुट, पुणे, मु.रा.कागलखेड, ता.आष्टी बीड) तर 20 वर्षीय अज्ञात इसमाचा समावेश आहे.