पुणे / सरोवराच्या किनारी येत होता रडण्याचा आवाज, जवळ जाताच अशा अवस्थेत सापडले दोन नवजात

  • मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांना मुले आढळले, पोलिसांना दिली माहिती 
  • सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या सहाय्याने पोलिस मुलांना सोडणार्‍याचा घेत आहेत शोध 

दिव्य मराठी वेब टीम

Jan 14,2020 01:07:50 PM IST

पुणे - पाषाण सरोवराजवळ मंगळवारी दोन नवजात मुले आढळून आली. यात एक मुलगा तर दुसरी मुलगी आहे. सध्या दोघांनाही एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या मुलांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिस आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेराच्या सहायाने मुलांना येथे सोडणाऱ्याचा शोध घेत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, तलावाजवळ मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांना सरोवराजवळ रडणाच्या आवाज येत होता. तेथे जाऊन पाहताच ही दोन मुले एका कपड्यात गुंडाळलेले आढळून आली. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. गुंडाळलेल्या कपड्यावरून मुले चांगल्या घरची असून त्यांना मुद्दामहून येथे सोडले असल्याचा अंदाच वर्तवण्यात येत आहे.

X
COMMENT