Home | Maharashtra | Pune | Pune University removes chapter on builder DSK from commerce syllabus

बिल्डर डीएसकेंवरील पाठ पुणे विद्यापीठाने वगळला; वाद झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने घेतला निर्णय

प्रतिनिधी | Update - Sep 04, 2018, 07:59 AM IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या "यशोगाथा' या पुस्तकात उद्योगपती डी. एस. कुलकर्णी

  • Pune University removes chapter on builder DSK from commerce syllabus

    पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या "यशोगाथा' या पुस्तकात उद्योगपती डी. एस. कुलकर्णी यांच्यावर आधारित असलेला धडा वगळण्यात आला आहे. डीएसकेंचा उद्योगसमूह यशाच्या शिखरावर असताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत मोठा उद्योग उभारणाऱ्या डीएस कुलकर्णी यांच्या कर्तृत्वावर आधारित 'डीएसके - वास्तू उद्योगातील अग्रणी' अशा शीर्षकाचा लेख वाणिज्य विद्याशाखेच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता. डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी हा लेख लिहिला होता. वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'बिझनेस आंत्रप्रिनरशिप स्पेशल पेपर ३ मधील द स्टडी ऑफ ऑटोबायोग्राफीज ऑफ फॉलोइंग आंत्रप्रिनर्स' मधील डीएसकेंवरील मजकूरही वगळण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून डीएसके आणि समूहातील अन्य पदाधिकाऱ्यांनी हजारो ग्राहक, ठेवीदार, गुंतवणूकदार यांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. तसेच अनेक वित्तीय संस्था, बँकांकडून प्रचंड प्रमाणात कर्ज उचलून ते बुडवून त्यांचीही फसवणूक केल्याने डीएसके, त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.


    राष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेडही आक्रमक
    डीएसकेंनी केलेली फसवणूक, गैरव्यवहार लक्षात घेता त्यांच्यावरील पाठ अभ्यासक्रमातून वगळण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेडसह काही संघटना, पक्षांनी विद्यापीठाकडे केली होती. ती लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने डीएसकेंवरील पाठ वगळण्याचा निर्णय घेऊन, त्याची अंमलबजावणी केली आहे. डीएसके तुरुंगात असून, सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हा पाठ अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याने संदिग्धता दूर झाली आहे.

Trending