Home | Maharashtra | Pune | pune vardhman jewellers robbery case

पुण्यात सराफ दुकान लुटणाऱ्या चाेरट्यांकडून पाेलिसांवर गाेळीबार

प्रतिनिधी | Update - Mar 01, 2019, 02:10 PM IST

शटर उचकटून २० हजारांचे सोने-चांदीचे दागिने लंपास

  • pune vardhman jewellers robbery case

    पुणे - खडकी परिसरातील बाेपाेडी येथील रविराज हाइट्स भाऊ पाटील रस्त्यावर गुरुवारी पहाटे चार वाजता वर्धमान ज्वेलर्स या सराफ दुकानावर दराेडा टाकत असलेल्या चाेरट्यांना पाेलिसांनी राेखण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी पाेलिसांवर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पाेलिस शिपाई माधव गाेपनर यांनी खडकी पाेलिस ठाण्यात कारमधील तीन अनाेळखी व्यक्तींविरोधात फिर्याद दिली आहे.


    पाेलिस कर्मचारी माधव गाेपनर हे त्यांचे सहकारी पाेलिस शिपाई एस.घाेलप यांच्यासह बाेपाेडी मार्शल ड्यूटी कर्तव्य बजावत असताना त्यांना वर्धमान ज्वेलर्स दुकानासमाेर पहाटे चार वाजता एक इनाेव्हा कार थांबलेली दिसली.


    या वेळी पाेलिस शिपाई हे तिथे जाताच संबंधित व्यक्ती वर्धमान ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून २० हजार रुपये सोन्या- चांदीचे दागिने घेऊन पळून जात होता. त्या वेळी पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांवर गोळीबार करत पळ काढला. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

Trending