पुणेकरांचा अनोखा हेल्मेट / पुणेकरांचा अनोखा हेल्मेट विरोध; पातेले डोक्यावर ठेवून वकिलाचा दुचाकी प्रवास

हेल्मेटसक्ती रद्दण्यासाठी पुणेकर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना निवेदन देणार आहेत. 

Jan 04,2019 08:22:00 AM IST

पुणे- पोलिसांनी हेल्मेट सक्ती लागू केल्यानंतर पुण्यात विविध मार्गांनी त्याचा विरोध होत आहे. गुरुवारी येथील एका वकिलाने डोक्यावर हेल्मेटच्या जागी पातेले ठेवून दुचाकीवरून प्रवास केला. वाजेद खान-बीडकर असे या वकिलाचे नाव आहे. आयएसआय मार्कचे चांगल्या प्रतीचे हेल्मेट विकत घेण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, अन्यथा घरातील पातेले डाेक्यावर वापरण्याची परवानगी मिळावी, असे निवेदन त्यांनी वाहतूक पाेलिस आयुक्तांना दिले आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरत ९ हजार ५१९ जणांवर कारवाई करण्यात आली.

बीडकर म्हणाले, हेल्मेट या शब्दाची डिक्शनरी व गुगलप्रमाणे व्याख्या केल्यास शिरस्त्राण, लाेहे की ठाेप, लाेहे का टाेप अशी व्याख्या आहे. हेल्मेट हे पूर्ण पद्धतीने झाकलेले असल्यामुळे मला श्वास घेण्यास त्रास हाेताे व हेल्मेट हे कायद्याने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे मार्केटला विक्री केले जात नाही. दरम्यान, गुरुवारी पाेलिस आयुक्त कार्यालयावर हेल्मेट न घालता दुचाकी रॅली काढत निषेध नाेंदवण्यात आला. रॅलीत माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे सहभागी झाले होते.


पुण्यात गुरुवारी वेगवेगळ्या पद्धतीने हेल्मेट सक्तीचा निषेध करण्यात आला. या वेळी राजकीय पक्षांसह पुण्यातील सामान्य नागरिकांनी सहभाग घेऊन वाहतूक पोलिसांतप्रति रोष व्यक्त केला.

X