आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pune's Film And Television Institute Of India Has Been Named As One Of The Top 10 Film Institutes In The World

पुण्याचे 'फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया' चे नाव जगातील 10 सर्वश्रेष्ठ चित्रपट संस्थांमध्ये झाले सामील 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सीईओ वर्ल्ड मॅगझिनने 'फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया' (एफटीआयआय) ला जगातील 10 सर्वश्रेष्ठ चित्रपट संस्थांमध्ये स्थान दिले आहे. सीईओ वर्ल्ड मॅगझिनने जगातील सर्वश्रेष्ठ 30 चित्रपट संस्थाची नावे प्रकाशित केली आहेत. यामध्ये एफटीआयआय दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचे 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' (एनएसडी) 14 व्या, तर कोलकात्याचे 'सत्यजीत रे फिल्म इंस्टीट्यूट' 22व व्या क्रमांकावर आहे. 

 

यूएससी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स आहे पहिल्या क्रमांकावर... 
सीईओ वर्ल्ड मॅगझिन वर्ल्ड बिजनेस मॅगझिन आहे. या लिस्टमध्ये अमेरिकी चित्रपट संस्था यूएससी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्सला सर्वश्रेष्ठ फिल्म संस्थेचा दर्जा दिला गेला आहे. अमेरिकी चित्रपट संस्थांमध्ये 'अमेरिकन फिल्म इंस्टीट्यूट' (एएफआई), 'यूसीएलए स्कूल ऑफ थिएटर फिल्म अँड टेलिव्हिजन', 'कॅलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ द आर्ट्स' ला एक ते चार या क्रमांकावर जागा मिळाल्या आहेत. 

 

'नॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कुल' (ब्रिटेन) ला या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. 'न्यूयॉर्क फिल्म अकादमी' सहाव्या क्रमांकावर आहे, मात्र न्यूयॉर्कचे 'एनवाययू टिश स्कूल ऑफ द आर्ट्स' सातव्या क्रमांकावर आहे. कॅनडा येथील 'टोरांटो फिल्म स्कूल' आठव्या आणि ऑस्ट्रेलियाचे 'सिडनी फिल्म स्कूल' ला नववे स्थान मिळाले. 

पहिल्या 10 मध्ये सामील होणारी ही आहे देशातील एकमेव संस्था... 
'फिल्म अँड टेलिव्हिजन' चे ट्रेनिंग देण्याबरोबरच भारतीय चित्रपटांसाठी उत्तम कलाकार तयार करणारे एफटीआयआय दहावे स्थान मिळाले आहे. पहिल्या 10 मध्ये सामील होणारे हे देशातील एकमेव इन्स्टिट्यूट आहे. भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये एफटीआयआयचे खूप मोठे योगदान आहे. एफटीआयआयचे डायरेक्टर भूपेंद्र कैंथोलाने सांगितले की, सीईओ वर्ल्ड मॅगझिनने महाल हा सन्मान दिला आहे.  

 

अनेक प्रसिद्ध कलाकार येथून मिळेल आहेत....  
येथून अभिनेत्री जया बच्चन, कुलभूषण खरबंदा, मिथुन चक्रवर्ती, मुकेश खन्ना, नसीरुद्दीन शाह, नवीन निश्चल, ओम पुरी, प्रकाश झा, संजय लीला भन्साळी, सतीश कौशिक, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक मोठया कलाकारांनी अभिनय, दिग्दर्शन यांसारख्या गोष्टी शिकल्या.  

बातम्या आणखी आहेत...