आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्शन एक्सप्रेस : \'कमळाची मेंदी काढून मोदी सरकार येत नाही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी काही लपवत नाहीत, करून दाखवतात, असे म्हटले जाते. मात्र, तसे दिसत नाही. लोकांची पत्ते उघडण्याची इच्छा नाही, असे वाटते. निवडणूक चर्चा ऐकण्यासाठी मला दोन डबे आणि चार जागा बदलाव्या लागल्या. यानंतर गप्पा सुरू झाल्या..

‘इक तकडी (तराजू) बाबे नानक दी । जेडी तेरा-तेरा तोल दी सी । ऐ तकडी बाबे बादल दी । जेडी तेरा-तेरा तोल दी है ।’ असे सांगत अकालींना आता मत का द्यावे, अशी विचारणा जतिंदर सिंह यांनी केली. निवडणुकीबाबत एवढा संभ्रम याआधी कधीच नव्हता.
जतिंदर रेल्वे हॉकी संघाचे प्रशिक्षक आहे. मालमत्तेच्या वाटणीसाठी घराकडे निघाले आहेत. ते म्हणाले, पंजाबमध्ये मोदींची लाट कमी आहे. तसे पाहिले, तर त्यांनी आमच्या शिखांना गुजरातमधून पिटाळून लावले. सध्या केजरीवाल यांचे जे चालू आहे, ते पाहिल्यास आम आदमी पक्षावरील विश्वासच उडून गेला आहे.

यावर जतिंदर यांच्या पत्नी रुबी म्हणाल्या, आमची रेल्वे गुजरातमधून निघाली, तेव्हा 100 लोक चहाची केटली आणि मेंदीचे कोन घेऊन चढले. हातावर काढलेले कमळाचे फूल दाखवत म्हणाल्या, ही पाहा मेंदी. कपडेही घाण केले. सर्वजण ओरडत होते, पीएम कैसा हो, मोदी जैसा हो। हे सगळे करून थोडेच मोदी पंतप्रधान होतील.

बाजूला बसलेले रोहित शर्मा म्हणाले, पंजाबमध्ये केवळ गाणी तयार होऊ शकतात. सरकार तर अकालीच स्थापणार. त्या वेळी रुबी म्हणाल्या, गेल्या वर्षी माझ्या मुलाला पंजाब विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. मात्र, त्याला पाठवले नाही. पंजाबमध्ये कोणी मुलांना ठेवू इच्छित नाही. पाठवले तर तो वाया जाणार. बादल आहेत ना इथे. त्यांनी मतदानाआधी दारू-अमली पदार्थ मिळण्यातील अडकाठी दूर केली आहे. तरुणांना तर ते हवेच आहे. सर्व तरुण अकालींच्या सर्मथनार्थ घोषणा देतील- अकालियां दी बल्ले बल्ले, काँग्रेसियां दी थल्ले थल्ले। त्यांना ते निवडून देतील. पुढील निवडणुकीत तरुण पिढी : चर्चेदम्यान मनिंदर सैनी तिकीट तपासण्यासाठी आले. मात्र, चर्चेत चांगलेच रमले आणि म्हणाले, सारे काही बादल यांच्या मुठीत आहे. ते आहेत म्हणून शांतता आहे, मी मुलांना सांगितले, लवकर परदेशात जा, इथे काहीच होणार नाही. फक्त मोदी येतील. जतिंदर सिंह यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि म्हणाले, नाही, पुढील निवडणुकीत पाहा. तरुण पिढींचा सहभाग असेल. या म्हातार्‍यांची सुट्टी होईल.
पुढील स्थानक जम्मू तावी..