Home | National | Other State | Punjab Candidate got only 5 vote, but his family members are 9

घरातील सदस्यांची संख्या 9 पण मतं मिळाले फक्त 5; कॅमेरासमोर ढसा-ढसा रडला हा अपक्ष उमेदवार...

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 24, 2019, 03:43 PM IST

नितू शुत्तर्ण वाला हे जालंधर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते

  • Punjab Candidate got only 5 vote, but his family members are 9

    जालिंधर(पंजाब)- लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मोदींच्या नेतृत्त्वात एनडीएने 350 जागा मिळवल्या. बहुमत मिळवत एनडीए सत्ता स्थापन करणार आहे. यात निकालावेळी आणि नंतरही अनेक रंजक गोष्टी घडल्या. पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघातून अशीच काहीशी रंजक गोष्ट समोर आली.


    नितू शुत्तर्ण वाला हे जालंधर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते. काँग्रेस, बसप आणि आम आदमी पक्षाची ताकद असलेल्या या मतदारसंघात नितू शुत्तर्ण वाला यांनी आपले नशीब आजमवाण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यात त्यांना अपयश आले. नितू शुत्तर्ण वाला यांना आपल्या पराभवाची चिंत नाही किंवा दु:खही नाही. तर त्यांच्या चिंतेचे आणि दु:खाचे कारण वेगळेच आहे.


    नितू शुत्तर्ण वाला यांच्या कुटुंबात एकूण 9 सदस्य आहेत पण त्यांना फक्त 5 मतं मिळाली आहेत. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रीय व्यक्त केली आहे. ते म्हणाले- "माझ्या कुटुंबात 9 जण असताना, मला फक्त 5 मतं कशी मिळाली?" असे म्हणते ते कॅमेरासमोरच ढसा-ढसा रडले.पंजाबच्या एका स्थानिक वृत्तवाहिनीने नितू शुत्तर्ण वाला यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी 9 सदस्यांच्या घरातील केवळ 5 मतं मिळाल्याची खंत व्यक्त करत नाराजी व्यक्त करत त्यांना रडू आवरलं नाही. यावेळी वाला यांनी ईव्हएमवरही शंका घेतली.


Trending