आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंदिगड- पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाक लष्करप्रमुख कमर जावेद बाजवांची गळाभेट घेतली. ही गळाभेट त्यांच्या अंगलट आली आहे. रविवारी ते वाघा बॉर्डरवरून भारतात परतले. या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु सिद्धू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी मात्र त्यांनी फेटाळून लावली. अमरिंदरसिंग म्हणाले, सिद्धू यांनी असे वर्तन करायला नको होते. पाकव्याप्त काश्मीरच्या राष्ट्रपतीसोबत बसण्याच्या प्रश्नांवरही मुख्यमंत्री म्हणाले, कदाचित सिद्धू त्यांना ओळखत नसावेत. शिवाय आसन व्यवस्था त्यांच्या हातात नव्हती. परंतु पाक लष्करप्रमुखांची गळाभेट घेणे योग्य नव्हते.
आमचे जवान दरराेज शहीद होतात. त्यांना ठार मारण्याचे आदेश पाक लष्करप्रमुख देतो. पाकिस्तानचे सैनिक त्यांच्या लष्करप्रमुखांचे आदेश ऐकत असतील. परंतु आमच्या सैनिक शहीद होण्यास पाक लष्करप्रमुख कमर बाजवा हेच जबाबदार आहेत. सिद्धू यांनी त्यांच्याशी असा सलोखा दाखवण्याची गरज नव्हती, असे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी म्हटले. तर
नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, मी पाकिस्तानात द्वेषाची आग शांत करण्यासाठी गेलो होतो. माझा पाक दौरा खूप महत्त्वाचा ठरला आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेण्यावर खुलासा करताना सिद्धू म्हणाले, पाक लष्करप्रमुखांनी गुरू नानकदेव यांच्या ५५० व्या गुरुपर्वानिमित्त करतारपूर कॉरिडॉर खुला करण्याचा निर्णय सांगितला. त्याबद्दल त्यांनीच माझी गळाभेट घेतली, असे सिद्धू यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.