आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Government Scheme Farmers Can Obtain Petrol, Diesel On Credit, Pay At Harvest Time

Fuel Credit / या राज्यातील सरकार शेतकऱ्यांना उसणे देणार पट्रोल-डीझेल; पीक आल्यानंतरच पैसे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - महाराष्ट्रासह देशभरात लोक दुष्काळाचा सामना करत आहेत. अनेकांना पिण्याचे पाणी तर सोडाच एक भांडे पाणी मिळणे सुद्धा अशक्य झाले. अशात भर उन्हात राबणाऱ्या शेतकऱ्याचे काय हाल होत असतील याची कल्पना सुद्धा करता येत नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांची छोटीशी मदत सुद्धा खूप मोठी ठरू शकतो. त्याचीच दखल पंजाब सरकारने दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जोपर्यंत त्यांचे पीक मिळत नाही, तोपर्यंत ट्रॅक्टर आणि वाहनांमध्ये इंधनाची चिंता करण्याची गरज नाही. पंजाब सरकारने एका ऑइल कंपनीसोबत करार केला. त्यानुसार, शेतकऱ्यांना पीक येत नाही तोपर्यंत इंधनासाठी पैसे द्यावे लागणार नाही.


पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि राज्य सरकारकडून लवकरच योजनेची सुरुवात होत आहे. यामध्ये कंपनीच्या पेट्रोल आणि डीझेल पंपांवर हवे तेव्हा इंधन भरता येईल. पंजाब सरकारचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्या सरकारने इंडियन ऑइलसोबत अशा स्वरुपाचा करार केला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पंजाबमध्ये सहकारी संस्थांच्या रिकाम्या जमीनींवर हे रीटेल आउटलेट उघडले जातील. उसणे दिल्या जाणाऱ्या इंधनाची रक्कम शेतकऱ्यांकडून पीक काढल्यानंतरच घेतली जाईल.

बातम्या आणखी आहेत...