Home | National | Other State | Punjab govt employees got double salaries due to SBI server down issue

पंजाबच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला Double पगार, SBI च्या तांत्रिक बिघाडामुळे उडाला गोंधळ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 05:07 PM IST

अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये महिन्याचा पगार दुप्पट जमा झाला.

 • Punjab govt employees got double salaries due to SBI server down issue

  नवी दिल्ली - देशाची सर्वात मोठी बँक SBI ने 31 ऑक्टोबर रोजी आपल्या एटीएम मशीनमधून कॅश काढण्याची सीमा दुप्पट केली. यापूर्वी 20 हजार रुपयांची दैनंदिन मर्यादा 40 हजार रुपये करण्यात आली. परंतु, हे करत असताना एसबीआयकडून अशी एक चूक घडली की पंजाबच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद काही क्षणांसाठी का होत नाही दुपटीने वाढला. अर्थात अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये महिन्याचा पगार दुप्पट जमा झाला. बँकेने आपले सर्व्हर खराब झाल्याने ही तांत्रिक चूक घडल्याचे म्हटले आहे. सोबतच ज्या-ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात दुप्पट पगार पडला, त्या सर्वांची खाती आता बँक सील करत आहे. इतर काही राज्यांमध्येही सुद्धा या चुकीचा परिणाम दिसून आला आहे.

  सॉफ्टवेअरच्या गोंधळामुळे झाली चूक

  बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब सरकारने सर्वच विभागांना निर्देश दिले आहेत की त्यांनी आप-आपल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक चुकीची माहिती द्यावी. या तांत्रिक बिघाडामुळे आपल्या खात्यांत चुकून डबल पगार जमा झाला असे त्यांना सांगावे. यानंतर सरकारने एक आदेश जारी करून कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यातून रक्कम काढू नये असे सांगितले.

  पुढे वाचा, मग काय घडले...

 • Punjab govt employees got double salaries due to SBI server down issue

  उर्वरीत खातेही होणार सील
  डबल वेतन जमा झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या खात्यातून अतिरिक्त पैसे काढून नोंद करण्यात आली. परंतु, अजुनही अनेक कर्मचाऱ्यांना बँकेत रिपोर्ट केलेले नाही. त्यापैकी काहींना एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न देखील केला. काही लोक त्यामध्ये यशस्वी ठरले. तर काहींना ते पैसे काढताच आले नाहीत. ज्यांनी आपल्या वेतनापेक्षा अधिकची रक्कम काढली त्यांच्याकडून बँक पैसे वसूल करणार आहे. 

 • Punjab govt employees got double salaries due to SBI server down issue

  फ्रॉड व्यवहार टाळण्यासाठी घेतला हा निर्णय
  अतिरिक्त रक्कम जमा झालेल्यांना खात्यातून पैसे काढण्यास रोखण्यासाठी बँकेने काही उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये एटीएममधून काढल्या जाणाऱ्या रकमेवर आणि ऑनलाइन व्यवहारावर सुद्धा लिमिट ठरवण्यात आली आहे. ही लिमिट 31 ऑक्टोबरपासून सर्वच एसबीआय एटीएमवर लागू करण्यात आली. 

Trending